mahindra carsAutomobile- आपण सणासुदीच्या काळात कार घेतली नसेल तर महिंद्रा कंपनी (mahindra) तुमच्यासाठी बंपर डिस्काउंट ऑफर घेऊन आली आहे. महिंद्राने वर्षाच्या शेवटी डिस्काउंटच्या ऑफर सुरु केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना लोकप्रिय एसयूव्ही खरेदीवर जास्तीत जास्त ३ लाख रुपयांची सूट दिली जात आहे. ही ऑफर फक्त डिसेंबर २०२० पर्यंत लागू आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला जर कार खरेदीवर (mahindra cars) मोठ्या प्रमाणात सूट मिळवायची असेल तर तुमच्याकडे ३ आठवड्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे.

------------------------------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------------------------

Mahindra XUV500: महिंद्रा एक्सयूव्ही ५०० वर मोठी सवलत मिळत आहे. महिंद्रा या एसयूव्हीवर ५६,७६० रुपयांची संपूर्ण डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटच्या ऑफरमध्ये अनेक फायदे समाविष्ट आहेत ज्यात आपल्याला १२,७६० रुपयांची रोकड सवलत, ३०,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर, ९००० रुपयांची कॉर्पोरेट ऑफर आणि ५००० रुपयांच्या इतर ऑफर आहेत.(Automobile)

Mahindra Alturas G4: या एक्सयूव्हीच्या खरेदीवर ग्राहकांना ३ लाख ६ हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. या एसयूव्हीची किंमत २८.७३ लाख रुपये पासून सुरू होते. परंतु आता कंपनी त्यावर ३ लाख ६ हजार रुपयांची सवलत देत आहे. ज्यात २.२० लाख रुपयांची रोकड सवलत, ५० हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट १६,००० रुपये आणि इतर २०,००० रुपयांची सवलत मिळत आहे.

Mahindra XUV300: या एक्सयूव्हीच्या खरेदीवर ३०,००० रुपयांची सूट देण्यात येत असून यात २५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५,००० रुपयांची कॉर्पोरेट सवलत आहे.

Mahindra Scorpio: महिंद्रा स्कॉर्पिओवर कंपनी ४१,१०० रुपयांचा डुस्काउंट देत आहे. ज्यामध्ये ११,१०० रुपये रोख सवलत, २५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५,००० रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट सवलत देत आहे.

Mahindra KUV100 NXT: या गा़डीवर कंपनी ६२,०५५ रुपयांची संपूर्ण सवलत देत आहे. या सवलतीच्या ऑफरमध्ये ३३,०५५ रुपयांची रोकड सूट, २०,००० एक्सचेंज ऑफर, कॉर्पोरेट ऑफर ४,००० रुपयांची आणि आणखी ५ हजार रुपयांची सूट समाविष्ट आहे.

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरोवरही कंपनीने ग्राहकांना चांगली सूट दिली आहे. २० हजार ५५० रुपये इतकी सूट दिली आहे. या सवलतीच्या ऑफरमध्ये ६,५५० रुपये रोख सूट, १०,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि ४,००० रुपयांची कॉर्पोरेट ऑफर देण्यात येत आहे.