sharad pawarpolitics news of maharashtra - राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत (Legislative Council) महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi government) दणदणीत विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. या धक्क्यातून भाजप (politics party of india)अद्यापही सावरत नाही तोच आता एका मित्र पक्षाने झटका दिला आहे. 

भाजपच्या (politics party of india) घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर ( rsp leader mahadev jankar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांची गुप्त भेट घेतली आहे. धनगर समाजाचे प्रमुख नेते असलेले महादेव जानकर यांनी शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

__________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________


पुण्याजवळील व्हिएसआय इनस्टिट्युटमध्ये महादेव जानकर यांनी शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी ( दि. 3 डिसेंबर) दिवशी ही भेट झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली. मात्र, ही भेट कशासाठी होती आणि चर्चेचा तपशील काय होता, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. 

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचे अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे असा दावा केला होता. नुकतेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला खिंडार पडले आहे. पदवीधर निवडणुकीमध्येही भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली होती. त्यानंतर बीडमध्ये भाजपचे माजी खासदार आणि राज्यमंत्री जयसिंग गायकवाड यांनी जाहीरपणे भाजपवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.