kill leopard


मागील पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत होती. आता पर्यंत तिघांचे बळी घेतले. नरभक्षक बीबट्याला (leopard) ठार मारण्यासाठी वन विभागाने सहा शार्पसूटरची नियुक्ती केली होती. अखेर आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याला कंठस्नान घालण्यात यश (rescue team) आले आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

-------------------------------------------------

Must Read

1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर

2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद

4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO

--------------------------------------------------------

नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात अनेकांचा बळी घेऊन दशहत पसविणारा हा बिबट्या आज सायंकाळी मारला गेला. करमाळा तालुक्यातील वांगी शिवारात पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत वन विभागाचे शार्प शूटर चंद्रकात मंडलिक यांनी त्याला (rescue team) टिपले. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू होती.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि सोलापूर जिल्ह्याती करमाळा तालुक्यात या बिबट्याचा (leopard)  उपद्रव सुरू होता. या भागात त्याने १२ जणांचे बळी घेतले होते. एकट्या करमाळा तालुक्यातच तीन बळी घेतले होते. पिंजरे लावूनही तो सापडत नव्हता. उलट माणसांवर आणि प्राण्यांवर त्याचे हल्ले सुरूच होते. त्यामुळे त्याला पकडण्याचा आणि नाहीच सापडला तर ठार करण्याचा आदेश मुख्य वनसंरक्षकांनी दिला होता. त्यानुसार या बिबट्याला ठार करण्यात आले आहे.