kareena kapoor khan


करिना कपूर खान  (kareena kapoor khan) सोशल मीडियावर आल्यापासून खूपच सक्रिय आहे. करिनाने फॅमिलीसोबतचे ख्रिसमस सेलिब्रेशन करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर (instagram photo) केले आहे. सध्या करिना कपूर तिच्या प्रेग्नेंन्सीमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर ( viral on social media) ती तिचे बेबी बॅम्पचे फोटो पोस्ट करत असते. आता करिना कपूरने तिची काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये करिनासोबत सैफ अली खान आणि तैमूरसुद्धा दिसतो आहे.

करिनाचे हे फोटो स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध डेस्टिनेशन गस्टाडमधले आहेत. जिथे ती दरवर्षी सैफबरोबर व्हॅकेशन एन्जॉय करायला जाते. करिना आणि सैफ दरवर्षी ख्रिसमस आणि न्यू इअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी स्वित्झर्लंडला जातात. यावर्षी कोरोनामुळे सैफ-करिना देशाबाहेर जाऊ शकले नाहीत. हे फोटो ( viral on social media) शेअर करताना करिनाने लिहिले की, 'प्रिय गस्टाड आम्ही तुला यावर्षी मिस करु.'
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, करिना अखेरची अक्षय कुमारसोबत 'गुड न्यूज' चित्रपटात दिसली होती. पुढच्या वर्षाच्या अखेरीस करिना कपूर आणि आमिर खानचा 'लालसिंग चड्ढा' रिलीज होईल. याशिवाय करिना करण जोहरच्या मल्टीस्टारर  'तख्त' सिनेमातही दिसणार आहे. या चित्रपटात करीनाशिवाय अनिल कपूर, विक्की कौशल, रणवीर सिंग, जान्हवी कपूर, आलिया भट्ट आणि भूमि पेडणेकर दिसणार आहेत.