kangana-over-derogatory-tweets

शेतक-यांनी गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. सरकारनं नव्यानं आणलेल्या त्या विधेयकाला त्यांनी न जुमानण्याचे ठरवले आहे. त्यासाठी दिल्लीत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी शेतक-यांवर बळाचा वापर केल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या बाजूनं बोलत शेतक-यांना नावं ठेवणा-या कंगणाला (Kangana Ranaut) कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. 

___________________________

Must Read

1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

2) HDFC बँकेला मोठा झटका!

3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं

4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले

6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...

_____________________________

द दिल्ली शीख गुरुव्दारा मॅनेजमेंट कमिटी (डीएसजीएमसी) यांच्यावतीने ही नोटीस पाठविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कंगणानं शेतक-यांच्या आंदोलनाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे ती वादाच्या भोव-यात सापडली होती. अखेर तिला हा वाद भोवला आहे. शेतक-यांच्या विरोधात अपमानास्पद बोलणं यासाठी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. यापुढे कंगणानं अशाप्रकारची वक्तव्यं न करता शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी त्या नोटीशीत करण्यात आली आहे.


 

याविषयची अधिक माहिती डीएसजीएमसीचे अध्यक्ष मजिंदर सिंग सिरसा यांनी शुक्रवारी दिली आहे. कंगणाला शेतक-यांच्या विरोधात केलेले व्टिट डिलिट करण्यास सांगितले आहे. आम्ही कंगणाला तिनं शेतक-यांसाठी जे अपमानास्पद शब्द वापरले त्यासाठी नोटीस पाठवली आहे. तिनं एका शेतकरी आजींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. 100 रुपयांमध्ये शेतकरी आजी त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. अशाप्रकारचं वक्तव्य कंगणानं केलं. त्यानंतर ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली. 


कंगणानं केलेल्या व्टिटमुळे शेतकरी हे देशाच्या विरोधात आहे अशाप्रकारचे चित्र निर्माण झाले आहे. त्यांच्या आंदोलनाला त्या नजरेतून पाहिले जात आहे. त्यामुळे तिनं विनाशर्त माफी मागावी अशी मागणी नोटीशीच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे सिरसा यांनी सांगितले. सीएएच्या विरोधात ज्या आजींनी आपली स्पष्ट भूमिका मांडली अशा बिल्कीस बानो यांच्यावर टीका करण्यास कंगणानं मागे पुढे पाहिले नाही.


बानो यांच्या शाहिनबाग येथील लढयाची देशपातळीवर दखल घेण्यात आली होती. शाहीनबागच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आजी आता दिल्लीतही शेतक-यांच्या बाजूनं उभ्या राहिल्या. अस खोचक व्टिट तिनं केलं आहे. "same Dadi" who featured in Time Magazine was "available in 100 rupees". असंही ती म्हणाली होती.