john abraham bikes collectionentertainment- बॉलिवूडच्या पिळदार शरीरयष्टी असलेल्या अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहमचे (john abraham)नाव सर्वात वर आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या जॉन अब्राहमने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये (bollywood) स्वत:चे खास स्थान निर्माण केले. आज जॉनचा वाढदिवस.

कॉलेज जीवनात मॉडेलिंगची सुरुवात, मग काही म्युझिक व्हिडीओ आणि यानंतर मीडिया प्लानर असा सगळा प्रवास करत करत जॉनला ‘जिस्म’ या सिनेमात संधी मिळाली. यानंतर त्याने पाप, लकीर सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला यश मिळाले नाही. यादरम्यान यश राज फिल्मसच्या ‘धूम’ हा सिनेमा जॉनला मिळाला आणि यानंतर त्याने कधीच  मागे वळून पाहिले नाही. 

----------------------------------------------------------

Must Read

1) कोल्हापूर : पंचगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू

2) `पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....`

3) TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

4) ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

-------------------------------------------------------

आज आम्ही जॉनच्या (john abraham) करिअरबद्दल नाही तर त्याच्या एका वेडाबद्दल बोलणार आहोत. होय, बाईकसाठी जॉन अगदी वेडा आहे. त्याच्याकडे महागड्या बाईक्सचे कलेक्शन आहे. आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
जॉनच्या बाईक कलेक्शनमध्ये (bikes) यामाहा आर 1, कावासकी निंजा, डुकाती डिवेल, सुजुकी हायाबुसा, महिंद्रा मोजो यांसारख्या अनेक महागड्या बाईक्स आहेत. त्याच्या यामाहा व्हीएमएक्स या बाईकची किंमत तर 29 लाख रुपये आहे. तसेच आॅडी क्यू 3, आॅडी क्यू 7, लॅम्बोर्गिनी गॅलार्डो, निसान जीटीआर, मारुती जिप्सी अशा देखील गाड्या त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत.

जॉनकडे असलेल्या ‘यामाहा आर -1’बाईक (bikes) मध्ये 997 सीसी, क्रॉस प्लेन, 4-सिलिंडर,4 वोल्व इंजन आहे. तसेच ही बाईक रॅम एअर प्रेशरायजेशन शिवाय २०० एचपीची पर्यंतची क्षमता देते. या बाईकची किंमत 20.73 लाख आहे. 

‘कावासाकी निंजा जेवेआर’ ची भारतात विक्री बंद झाली असली तरी जॉनकडे मात्र ही बाईक अजूनही आहे.  ‘दुकाती’ जॉनच्या फेव्हरेट बाईकमधील एक आहे. या बाईकची किंमत जवळपास 19.19लाख आहे. जॉन अब्राहमच्या ‘महिंद्रा मोजो’मध्ये लिक्विड कूल्ड 300सीसीचे इंजिन आहे.   यूएसडी फ्रंट फॉर्क्स, गॅस चार्ज मोनोशॉक सारखे शानदार फिचर्स आहेत.

नेटवर्थियर या बेवसाईटनुसार जॉनकडे आजच्या घडीला 355 कोटीहून अधिक प्रॉपर्टी आहे. त्याचे घर  5000 स्केअर फूटचे असून ते सी फेसिंग आहे. 

जॉन अब्राहम एका चित्रपटात काम करण्यासाठी 15 कोटी घेतो. तसेच अनेक महत्त्वाच्या ब्रँड्सची तो जाहिरात करतो. यासोबतच तो एक निर्माता आहे. त्याला स्टॉक मार्केटऐवजी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला अधिक आवडते. त्यामुळे त्याने मुंबईतील वांद्रे आणि खार अशा दोन ठिकाणी घरे घेतली आहेत. एवढेच नव्हे तर पुण्यात त्याचे फिटनेस सेंटर आहे.