recruitmentrecruitment- राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने येत्या 12 व 13 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय महारोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. यातून उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. उमेदवारांसाठी 70 हजार रिक्त पदे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

राज्यातील उद्योग, व्यवसाय पूर्ववत कार्यरत होत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या विविध संधी निर्माण झालेल्या आहेत. पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध नामांकित उद्योग, व्यवसाय यांना त्यांच्याकडील सर्वसाधारणपणे इयत्ता नववी पास पासून पुढे किंवा दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांसह सहभागी होण्यासाठी संधी मिळणार आहे.(recruitment)

Must Read

हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. नोकरी इच्छुक युवक-युवतींनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. होमपेजवरील जॉब सिकर लॉगिनमधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करणे आवश्‍यक आहे.

डॅशबोर्ड मधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्‍लिक करुन प्रथम पुणे विभाग व त्यानंतर पुणे जिल्हा निवडणून त्यातील रोजगार मेळाव्याची निवड करावी. उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती घ्यावी व आवश्‍यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदांची निवड करावी लागणार आहे.

इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमांद्वारे कळविण्यात येणार आहे. शक्‍य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे. इच्छुक युवक-युवतींनी 13 डिसेंबरपर्यंत आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.