
(Election) राज्यपाल नियुक्त आमदारांविरोधात करण्यात आलेली याचिका अकाली असून अद्याप राज्यपालांनी नावेच घोषित केलेली नाही, असा दावा राज्य सरकारच्या (State government) वतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.
विधान परिषदेवर नियुक्त केले जाणाऱ्या बारा आमदारांची यादी महाविकास आघाडीने राज्यपालांना दिली आहे. मात्र अद्यापही राज्यपालांनी त्याला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे त्याआधीच त्याला विरोध करणे योग्य नाही, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
Must Read
1) सुदर्शन पाटील यांचा दोनशे कार्यकर्त्यांसह सतेज पाटील गटात प्रवेश
2) कोल्हापूर: एकाच दिवशी नऊ सावकारांवर छापे
3) मोठी बातमी! क्रिकेट घोटाळाप्रकरणी 12 कोटींची संपत्ती जप्त
4) 'Pfizer ची कोरोना लस घेतली तर स्त्रियांना दाढी येईल
5) Aadhar च्या माध्यमातून Free मध्ये तयार करा Pan Card, हा आहे सोपा मार्ग
उर्मिला मातोंडकर, आनंद शिंदे, नितीन पाटील व अनिरुद्ध वनकर हे चार उमेदवार कला क्षेत्राशी निगडित आहेत. तर एकनाथ खडसे, राजू शेट्टी, सचिन सावंत यांच्यासह आठजण (Election) राजकीय क्षेत्रातील आहेत. कायद्यानुसार राज्यघटनेच्या अनुच्छेद १७१(५) अन्वये कला, साहित्य, सामाजिक कार्य, विज्ञान व सहकार चळवळ या क्षेत्रातील प्रस्तावित सदस्य असणे बंधनकारक आहे, असे याचिकेत म्हटले आहे.