investment ideasinvestment ideas- कोरोनासारख्या या जीवघेण्या काळात आपली सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. यासाठी मोदी सरकारने सुरू केलेली स्वस्त प्रीमियम योजना प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) तुमच्यासाठी उत्तम आहे. वित्त मंत्रालयाने (Finance Ministry) ट्वीटद्वारे पीएमजेजेबीवाय (पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना) बद्दल माहिती दिली आहे. 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) ही एक मुदत विमा योजना आहे. यामध्ये जर गुंतवणुकीनंतर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळणार आहेत. (invest in pm jeevan jyoti bima yojana and secure the safety of your loved ones)

----------------------------------------------------

Must Read

1) अजित पवारांनंतर भाजप आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

2) शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारनं सुरू केली ही नवी योजना

3) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

4) Facebook वरून मैत्री करून फसवणाऱ्या नागरिकाला अटक

5) ईशा गुप्‍ताच्या बाथरूम सेल्फीने सोशल मीडियावर धुमाकूळ

-----------------------------------------------------------------

मोदी सरकारने 9 मे 2015 रोजी पीएमजेजेबीवाय सुरू केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खातं असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक खातं बंद असल्यास किंवा प्रीमियम कट होण्याच्या वेळी खात्यात पूर्ण शिल्लक असल्यास विमा रद्द केला जाऊ शकतो.

पीएमजेजेबीवायची ( investment ideas) वैशिष्ट्ये

– ही योजना वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत कव्हर देते.

– कोणत्याही कारणामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला 2 लाख रुपयांची रक्कम मिळते.

– 18 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पीएमजेजेबीवायचे वार्षिक प्रीमियम फक्त 330 रुपये आहे.

– जर कोणी वर्षाच्या मध्ये पीएमजेजेबीवाय योजना सुरू केली तर खात्यामधून पैसे वजा करण्याच्या तारखेपासून नाही तर प्रीमियम अर्ज करण्याच्या तारखेच्या आधारे ठरवला जाईल.

काय आहे नियम आणि अटी

– पीएमजेजेबीवायशी एखादा व्यक्ती फक्त विमा कंपनी आणि बँक खात्याशी संबंधित असू शकते.

– पीएमजेजेबीवायचा क्लेम करण्यासाठी, विमाधारकाचे नॉमिनी/उत्तराधिकारी, ज्या व्यक्तीकडे विम्याचे खाते आहे अशा बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. यासाठी विमाधारकाचे डेथ सर्टिफिकेट व क्लेम फॉर्म जमा करावा लागतो. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हक्काची रक्कम नामनिर्देशित व्यक्तीच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.

– योजनेच्या 55 वर्षानंतर विमा आपोआप संपेल.

– ही एक फक्त मदतीची विमा पॉलिसी आहे, म्हणून फक्त मृत्यूचा समावेश आहे.

– मॅच्युरिटी बेनिफिट, सरेंडर व्हॅल्यू वगैरे यामध्ये काही नाही. (invest in pm jeevan jyoti bima yojana and secure the safety of your loved ones)