india-vs-australia-second-test-day-2-live-india

(Sports News) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रामध्ये भारताला (India vs Australia) दोन धक्के लागले. दिवसाच्या सुरूवातीलाच भारताने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांना गमावलं. चेतेश्वर पुजारा 17 रन करून तर शुभमन गिल 45 रन करून माघारी परतला. या दोघांना पॅट कमिन्सने (Pat Cummins) माघारी पाठवलं. दुसऱ्या दिवसाचा लंच झाला तेव्हा भारताचा स्कोअर 90-3 एवढा झाला आहे. अजूनही भारतीय टीम 105 रनने पिछाडीवर आहे. दिवसाची सुरूवात भारताने 36-1 अशी केली होती.

त्याआधी काल भारताने मयंक अगरवालच्या (Mayank Agarwal) रुपात पहिली विकेट गमावली होती. मयंक शून्य रन करून आऊट झाला होता. पहिल्या दिवशी टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या (Sports News) ऑस्ट्रेलियाला भारताने 195 रनवर रोखलं. बुमराहने 4 विकेट घेतल्या, तर अश्विनला 3, मोहम्मद सिराजला 2 आणि रविंद्र जडेजाला 1 विकेट मिळाली.

पहिल्या टेस्टमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर या टेस्ट मॅचमध्ये पुनरागमन करण्याचं मोठं आव्हान भारतीय टीमपुढे आहे. पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला होता. भारताचा टेस्ट क्रिकेटमधला हा निचांकी स्कोअर होता.