india tour of australia 2020 1st t20i

India tour of australia 2020 1st t20i : वन-डे मालिका गमावल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये आजपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. कॅनबेराच्या मैदानावर पहिला टी-२० सामना रंगणार असून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच (Aaron Finch) ने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय खेळाडू आयपीएलचा तेरावा हंगाम संपवून ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत, त्यामुळे वन-डे मालिका गमावली असली तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.

___________________________

Must Read

1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

2) HDFC बँकेला मोठा झटका!

3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं

4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले

6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...

_____________________________

दरम्यान भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यासाठी संजू सॅमसन(Sanju Samson), वॉशिंग्टन सुंदर या आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना स्थान दिलं आहे. याचसोबत अखेरची वन-डे गाजवणारा टी. नटराजनही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करतो आहे. त्यामुळे पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाची कामगिरी कशी होतेय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.