india close tomorrowkolhapur- सर्वसामान्य जनता, कामगार आणि शेतकऱ्यांचा (farmers) विरोध डावलून कायदे करण्याचा सपाटा केंद्रातील भाजपा सरकारने (politics party of India) सुरू ठेवला आहे. भांडवलदारांच्या हितासाठीच ही दडपशाही सुरू आहे. त्यामुळे देशाला हुकूमशाहीचा धोका आहे, असे मत जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी व्यक्त केले.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (८) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय येथील सर्वपक्षीय बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. शिंदे होते. येथील नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली.

-------------------------------------------------------

Must Read 
------------------------------------------------------------

शिंदे म्हणाले, अंबानी आणि अदानी यांच्या हिताचीच सरकारला काळजी आहे. कार्पोरेट कंपन्यांच्यामार्फत शेतीमाल खरेदी करण्याचे सरकारचे धोरण आहे. कांहीकाळ त्या कंपन्या शेतीमालाला चांगला भाव देतील. परंतु, त्यानंतर शेतकऱ्यांच्या (farmers) पिळवणुकीला मर्यादा राहणार नाही.

यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, ह्यभाकपह्णचे कॉ. दशरथ दळवी, काँगे्रसचे (politics party of India) शहराध्यक्ष बसवराज आजरी, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुंड्या पाटील, दलित महासंघाचे प्रकाश कांबळे यांचीही भाषणे झाली.

बैठकीस जनता दलाचे कार्याध्यक्ष उदय कदम, शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा, गडहिंग्लज व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजशेखर यरटे, तम्माण्णा पाटील, नगरसेविका सुनिता पाटील, क्रांतीदेवी शिवणे आदी उपस्थित होते. जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी प्रास्तावित केले. सागर पाटील यांनी आभार मानले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका पटवून देवून बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी गडहिंग्लज चेंबर आॅफ कॉमर्स व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवार दुपारी १ वाजता आयोजित पालिका सभागृहात बोलविण्यात आली आहे.