test match IND vs AUSSports news- भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (test match) पहिल्या सामन्याला आजपासून (१७ डिसेंबर) सुरुवात झाली. हा सामना ऍडलेड ओव्हल या मैदानावर होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवसातील दोन सत्रे संपल्यानंतर भारतीय संघाच्या तीन बाद १०७ धावा झाल्या आहेत. भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्‍वर पुजारा दुसऱ्या सत्राच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनचा शिकार ठरला. याचबरोबर, लायनने पुजाराला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करण्याची किमया केली.

----------------------------------------------------------

Must Read

1) कोल्हापूर : पंचगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू

2) `पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....`

3) TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

4) ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

-------------------------------------------------------

भारताची खराब सुरुवात

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेला आज सुरुवात झाली. ऍडलेड ओव्हलवरील या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉची दांडी गुल करत, भारताला पहिला धक्का दिला. दोन चौकार मारून चांगली सुरुवात देणाऱ्या मयंक अगरवालला पॅट कमिन्सने त्रिफळाचीत केले. मयंक बाद झाला, तेव्हा भारताची धावसंख्या ३२-२ अशी (Sports news) होती.

विराट-पुजाराची भागीदारी

दोन्ही युवा सलामीवीर तंबूत परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली व भरवशाच्या चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या दर्जेदार आक्रमणाचा समर्थपणे सामना करत त्यांनी भारताची बाजू लावून धरली. पहिले सत्र खेळून काढल्यानंतर दुसऱ्या सत्रातही त्यांनी उत्तम फलंदाजी केली. भारतीय डावाच्या ५० व्या षटकात त्यांनी भारताचे शतक धावफलकावर लावले.

पुजारा ठरला लायनचा शिकार

विराट (virat kohli) -पुजारा ज्याप्रकारे खेळत होते त्यावरून वाटत होते की, हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या सत्रात भारताचा एकही बळी पडू देणार नाहीत. मात्र, ५० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऑफस्पिनर नॅथन लायनने पुजाराला लेग स्लीपमध्ये उभ्या असलेल्या मार्नस लॅब्यूशानेच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. पंचांनी नाबाद ठरवल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने डीआरएस घेऊन निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरवला. पुजाराने १६० चेंडूंचा सामना करताना ४३ धावा काढल्या. यात दोन चौकारांचा समावेश होता.

लायनने केली पुजाराची दहावी शिकार

पहिल्या कसोटीतील (test match)  या बळीनंतर नॅथन लायनने पुजाराला कसोटीमध्ये दहाव्यांदा बाद करण्याची कामगिरी केली. लायनपाठोपाठ इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने पुजाराला सात वेळा कसोटी क्रिकेटमध्ये तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. त्यानंतर, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स, जोस हेजलवूड व ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी चार वेळा पुजाराला बाद केलेले दिसून येते.