murder case


crime news- सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढ्यात काही दिवसांपूर्वी एका 28 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी अवघ्या चार दिवसात हत्येचा उलगडा केला आहे. अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्यामुळे आईनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने मुलाची हत्या (murder case) केल्याचे तपासातून समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताबाई सुभाष जाधव असं आरोपी महिलेचं नाव आहे. आरोपी मुक्ताबाईचे तात्यासाहेब कदम याच्यासोबत प्रेमसंबंध होते. यातून दोघांनी अनैतिक संबंध (immoral relations) प्रस्तापित केले होते. पण, त्यांच्या या अनैतिक प्रेमसंबंधाला 22 वर्षीय मुलगा सिद्धेश्वर सुभाष जाधव हा अडथळा ठरत होता. त्यामुळे सिद्धेश्वरची हत्या करून मृतदेह हा परितेवाडी हद्दीत फेकून देण्यात आला होता.

Must Read

1) कळंबा कारागृह मोबाइल प्रकरणात इचलकरंजीने पाच जणांची चौकशी

2) कोल्हापुरात निवडणुकीनंतर महाविकास आघाडी: सतेज पाटील

3) भारताला सुरुवातीलाच दोन धक्के

4) अर्ध्या वयाच्या मुलाशी प्रेमसंबंधाचा शेवट

5) तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार

6) Vodafone Idea deploys 3G spectrum for 4G services in Mumbai


24 डिसेंबर रोजी गावातील काही तरुण हे माळावर असलेल्या चारीत गेले होते. तेव्हा त्यांना सिद्धेश्वरचा मृतदेह आढळून आला होता.  त्याच्या मानेवर आणि अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. तरुणांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि सिद्धेश्वरचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

22 वर्षीय सिद्धेश्वरची हत्या (murder case) कुणी केली असावी, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. गावातील लोकांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सिद्धेश्वरच्या लहान भाऊ बालाजीकडे विचारपूस केली. त्यावेळी आपली आई मुक्ताबाई हीचे शेजारी राहणाऱ्या तात्या कदम याच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्याला सिद्धेश्वरने विरोध केला होता. तात्या कदमचा आमच्या जमिनीवर डोळा होता. त्याने आईची सही घेऊन जमिनी हडपली होती, सिद्धेश्वरने त्याला विरोध केला होता. 

या वादातूनच सिद्धेश्वरची हत्या केली असावी असा संशय बालाजीने व्यक्त केला. बालाजीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुक्ताबाईला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातील मुक्ताबाईने उडवाउडवीची उत्तर दिली. पण पोलिसांनी बळाचा वापर केला असता मुक्ताबाईने आपल्या मुलाची हत्या केल्याचे कबूल केले.

आरोपी तात्या कदम आणि मुक्ताबाई हे शेतात शेजारी राहतात. तात्या कदमसोबत मुक्ताबाईचे गेल्या 5 वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मुक्ताबाईचा पती सुभाष हा दोन वर्षांपासून अचानक गायब झाला होता. त्यानंतर आरोपी तात्या कदम याने मुक्ताबाईची एक एकर जमीन ही आपल्या नावावर करून घेतली होती. त्यानंतर तिला शेतातच पत्राचे शेड उभे करून दिले होते. 

कदम याने आपल्या पत्नी आणि मुलाबाळांनाही घरातून बाहेर हाकलून दिले होते. मुलगा सिद्धेश्वरने याला कडाडून विरोध केला होता. यातून बऱ्याच वेळा सिद्धेश्वर आणि तात्या कदममध्ये वाद आणि भांडणेही झाली होती. या वादातून सिद्धेश्वरची हत्या करण्यात आली. आरोपी मुक्ताबाईला पोलिसांनी अटक केली असून तात्या कदम हा फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.