icici bank launches imobile pay

  आयसीआयसीआय बँकेचं (ICICI Bank) मोबाइल बँकिंगसाठी असलेलं iMobile हे ॲप बँकेने आता iMobile Pay या नावाने बाजारात आणलंय. यामध्ये एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. iMobile Pay ॲपच्या माध्यमातून आयसीआयसीआय बँकेत खातं नसलेली व्यक्तीही बँकिंग आणि पेमेंट सुविधांचा वापर करू शकणार आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक आयसीआयसीआयने ग्राहकांच्या सुविधा वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला असून, यूपीआय आयडीला बँक खातं जोडलेली व्यक्ती iMobile Pay या ॲपच्या माध्यामातून यूपीआय ट्रान्झॅक्शन (UPI Transactions) करू शकणार आहे, अशी माहिती आयसीआयसीआय बँकेने एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

__________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________

या प्रसिद्धीपत्रकानुसार आयसीआयसीआय बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनुप बागची म्हणाले, ‘आम्ही भारतातलं पहिलं मोबाईल बँकिंग ॲप iMobile 2008 मध्ये लाँच केलं होतं. ग्राहकांशी संवाद साधताना आम्हाला दोन प्रकारच्या ग्राहकांबाबत त्यांच्याशी बोलताना लक्षात आले. एक म्हणजे जे आमचे ग्राहक नाहीत म्हणजे ज्यांचं आयसीआयसीआय बँकेत खातं नाही अशा अनेकांना iMobile ॲप वापरायचं आहे  

दुसरं म्हणजे ग्राहकांनी वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी ॲप्स वापरून पाहिली पण त्यांच्या बँकिंग आणि पेमेंट्सच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारं एकच ॲप हवं होतं. या दोन गरजांचा विचार करून आम्ही आमचं iMobile सुसज्ज केलं. आता कोणत्याही बँकेचे ग्राहक आमच्या ॲपची सहजता, वेग आणि सुरक्षितता अनुभवू शकतात.’

ग्राहकाच्या बँकिंग, पेमेंट्स आणि फायनॅन्शियल सर्व्हिसेसशी संबंधित सर्व गरजा एका छताखाली पूर्ण करण्यासाठी आम्ही हे ॲप बाजारात आणलं असून अशा प्रकारचा हा भारतातला पहिलाच प्रयत्न आहे असा दावा आयसीआयसीआय बँकेनी केला आहे. आता कोणत्याही बँकेचा ग्राहक iMobile Pay वर लॉगइन करू शकतो. त्यानंतर त्याला त्याच्या बँक खात्याची माहिती ॲपमध्ये भरावी लागेल. मग तो बँक ट्रान्सफर, पेमेंट्स करू शकतो. त्याला यूपीआयचा वापर करून फोन नंबर, बँक खात्याचे डिटेल्स आणि क्यूआर कोड स्कॅनिंगनेही पेमेंट करता येतील.

ग्राहकाच्या विविध बँकांतील सर्व खात्यांची माहिती त्याला iMobile Pay मध्ये भरून ती सर्व खाती वापरता येतील. युटिलिटी बिल पेमेंट्स, मोबाईल रिचार्ज, सिबील स्कोर तपासणी, गुंतवणूक आणि प्रवासाचं बुकिंग या सेवाही लवकरच या ॲपवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर या ॲपवर एक्सपेन्स अनलायझर ही सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे जेणेकरून त्यांना महिन्यातील खर्च आणि बचतीचा अंदाज येईल अशी माहिती बँकेच्या प्रवक्त्याने दिली.