(ichalkaranji News) इचलकरंजी (Ichalkaranji) येथे यंत्रमाग उद्योगातील कामगारांना महागाई भत्त्याची रक्कम पिसरेटमध्ये बसवून 1 जानेवारी 2021 रोजी मजूरीवाढ जाहीर करण्याच्या मागणीचे निवेदन लालबावटा जनरल कामगार युनियनच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना दिले.
------------------------------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------------------------

सन 2013 मध्ये यंत्रमाग कामगारांना महागाई भत्ता पिसरेटमध्ये बसवुन मजुरीवाढ देण्याचा निर्णय झाला होता. जानेवारी ते डिसेंबर 20 या कालावधीत महागाई भत्त्यात 609 रुपयांची वाढ झाली आहे. झालेल्या करारानुसार ही महागाई भत्त्याची रक्कम पिसरेटमध्ये बसवून दरवर्षी 1 जानेवारी 2021 रोजी मजुरीवाढ जाहीर करण्याची मागणी लालबावटा जनरल कामगार युनियनने केली आहे. याशिष्टमंडळात भरमा कांबळे, दत्ता माने, शिवगोंडा खोत, सुभाष कांबळे, गोपाल पोला, बंडा पाटील यांचा समावेश होता.(ichalkaranji News)