(ichalkarnji news)
 
इचलकरंजी येथे मागील आठवड्यात येथील जुना चंदूर रोड परिसरातील महावीर भोजे यांच्या अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यात घुसून कामगाराला मारहाण करण्यासह यंत्रमागांची तोडफोड व नासधूस केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये वैभव बापू घोरपडे (वय 21), सुरज परशराम घोरपडे (वय 27), निलेश अनिल कोळी (वय 23), संदीप सुभाष सुर्यवंशी (वय 38), महेश दीपक सुर्यवंशी (वय 20), पंकज पांडुरंग शिंदे (वय 32), प्रथमेश जोतिराम चव्हाण (वय 20), गौरव भाऊसो नरवाडे (वय 19), मयुर शिवाजी शिंदे (वय 23 सर्व रा. काडापुरे तळ), सौरभ महादेव गंदुगडे (वय 29 रा. मंगळवार पेठ) व  दिपक मारुती धुमाळ (वय 23 रा. चिंचले गल्ली) यांचा समावेश आहे.(ichalkarnji news)

------------------------------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------------------------

याबाबत मिळालेली माहिती अशी, काडापुरे तळे परिसरात राहणारे मनोहर भोजे यांचा जुना चंदूर रोड परिसरात ऑटोलूम कारखाना आहे. 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास 12 जणांच्या टोळक्याने कारखान्यात प्रवेश करत गोंधळ घातला होता. त्यावेळी कारखान्यातील विशाल चौगुले या कामगारासह अन्य कामगारांना परत कामावर आल्यास पुन्हा येऊन मारणार अशी धमकी देत मारहाण (Beating) केली होती. त्याचबरोबर या टोळक्याने भोजे यांच्या कारखान्यातील एअरजेट लुमचे 12 यंत्राचे डिस्प्ले, ऑपरेटर पॅनल यांची मोठ्या नासधूस केल्याने सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात 12 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरिक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके कार्यरत होती. पोलिस उपनिरिक्षक प्रमोद मगर, रफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतारी, प्रकाश कांबळे, महेश पाटील, गजानन बरगाले, विजय माळवदे, अविनाश भोसले यांच्या पथकाने 11 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.