(Ichalkaranji News) इचलकरंजीत आज मंगळवार दिनांक 1 डिसेंबर रोजी पोलीस भरती 2020-21 साठी योद्धा अकॅडमी यांच्याकडून विशेष सेमिनार आयोजित करण्यात आले होते. या सेमिनारला (The seminarपरिसरातून प्रचंड प्रतिसाद लाभला. आज झालेल्या सेमिनार मध्ये औरंगाबाद चे गणित विशेष तज्ञ प्रा. रणजीत नेवडे यांचे  मार्गदर्शन लाभले. यंदाच्या होणाऱ्या पोलीस भरती मध्ये 12528 पदे भरती होणार आहेत. या पार्श्वभूमीवर योद्धा अकॅडमी कडून इचलकरंजी, पेठ वडगाव, कोल्हापूर, सांगली, पुणे इत्यादी परिसरात मार्गदर्शक शिबिरे व सेमिनार घेतली जात आहेत. सदर परिसरातून चांगला प्रतिसादही मिळत आहे.

या अकॅडमी कडून लेखी परीक्षेची 100% तयारी, प्रिंटेड नोट्स, साप्ताहिक चाचणी याच बरोबर तज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन दिले जात आहे. याशिवाय होमगार्ड (home Guardभरतीसाठी स्पेशल बॅचचे आयोजन करण्यात आले असून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या योद्धा अकॅडमी च्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन प्रा. सतीश पाटील (मो.9766861087) यांनी केले आहे.(Ichalkaranji News)