ichalkaranji nagarparishad


इचलकरंजी शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न सातत्याने उद्‌भवत आहे. यासाठी पालिकेने ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे. शहरात फेरीवाले झोन मंजूर झाले आहेत. त्याची जलद अंमलबजावणी होताना दिसत नाही. पालिकेचे (municipality) अतिक्रमण निर्मूलन पथक सक्षम नाही. कारवाईत सातत्य नाही. त्याचा परिणाम फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा गुंता वाढतच चालला आहे. 

अनेक दिवसांपासून शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न चर्चेत आहे. शहरातील मुख्य मार्ग हा फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे झाकोळला आहे. आता अनेक जागा फेरीवाल्यांच्या हक्काच्या बनल्या आहेत. सायंकाळनंतर तर उघड्यावर मांसाहारी खाद्य पदार्थ विक्री करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पालिकेकडून केवळ भुई भाडे वसूल केले जाते; पण शिस्तीकडे दुर्लक्ष केले. परिणामी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. 

-----------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणाचे नियोजन

2) मी मात्र कोल्हापूरला परत जाणार' : चंद्रकांत पाटला

3) राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी

4) सरकारी नोकरीत अव्वल स्थानी असणारे भारताचे 7 स्टार क्रिकेटपटू

-----------------------------------

मुळात फेरीवाल्यांना कायद्याने संरक्षण दिले आहे. त्यासाठी विशिष्ट नियमावली केली आहे; मात्र त्याकडे सोयीने दुर्लक्ष होताना दिसत आहे. हातगाडी लावताना किती जागा द्यावी, हेही निश्‍चित आहे, पण त्यापेक्षाही अतिरिक्त जागेवर कब्जा होताना अनेक ठिकाणी दिसते. शहरात सध्या 11 फेरीवाले झोन मंजूर आहेत. अद्याप 9 फेरीवाले झोन प्रस्तावित आहेत, मात्र याबाबतची सक्षमपणे व जलद गतीने कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे नो हॉकर्स झोनमध्येही फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसून येत आहे. 

सक्षम पथक हवे 

पालिकेचे (municipality) अतिक्रमण निर्मूलन पथक सक्षम नाही. या पथकाकडे अपुरी यंत्रणा आहे. कारवाई करताना पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नाही. राजकीय दबाव ठरलेला आहे. त्यामुळे या पथकाची जबाबदारीही घेण्यास टाळले जाते. या पथकाला सक्षम करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पथक सक्षम असेल आणि कारवाईत सातत्य असेल तर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणचा प्रश्‍नच उद्‌भवणार नाही, पण या सर्व मूलभूत गोष्टींकडेच पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. 

शासनाच्या निर्णयानुसार पालिकाअंतर्गत शहर फेरीवाला समिती कार्यरत आहे, पण वर्षभरात या समितीची सभाच झालेली नाही. फेरीवाल्यांच्या प्रश्‍नावर चर्चा होऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी ही समिती आहे, पण तिचे अस्तित्व नसल्यातच जमा आहे.