(ichalkaranji news) इचलकरंजी येथे इंदिरा गांधी (Indira Gandhi) सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कर्मचार्यांना कमी केल्याने संतप्त कर्मचार्यांनी मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाकडे धाव घेतली. कोरोना महामारीच्या काळात स्वत:च्या जीव धोक्यात घालून काम करूनही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी केल्याने कर्मचारी अधिकच संतापले. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील संबंधीत मक्तेदाराच्या पर्यवेक्षकाला धारेवर धरत घेरावा घातला.
कोरोना महामारीच्या काळात इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयातील वाढणारा ताण लक्षात घेऊन प्रशासनाने कर्मचार्यांची कंत्राटी पध्दतीने भरती केली. जिल्हा परिषदेने आयजीजीएच साठी 42 कर्मचार्यांना कंत्राट पध्दतीने सेवेत घेण्यासाठी जाहीर निविदा काढली. त्यानुसार अरिहंत सेल्स अॅण्ड सर्व्हीस कंपनीचे श्री. कटके या मक्तेदाराने निविदा भरून कर्मचार्यांची भरती केली. पुन्हा कर्मचार्यांची गरज भासल्यानंतर प्रशासनाने या मक्तेदाराकडून आणखी 25 कर्मचार्यांची भरती करण्यात आली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रुग्णालयावरील भार कमी झाला आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचार्यांना कामावरून कमी केले जात आहे. हा सर्व प्रकार कंत्राटी कर्मचार्यांच्या लक्षात आल्यानंतर न्यायासाठी त्यांनी मनसे कार्यालय गाठले.(ichalkaranji news)
Must Read
1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी
3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !
4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा
5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन
-------------------------------------------------------------------
मक्तेदार श्री. कटके यांना याबाबत कर्मचार्यांनी संपर्क साधल्यानंतर मक्तेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे काम न मिळणाच्या हमीमुळे संतापलेल्या कर्मचार्यांनी मक्तेदाराकडील पर्यवेक्षक योगेश सकटे व शिवाजी धुमाळ यांना धारेवर धरले. संतप्त कर्मचारी व मक्तेदार यांच्यातील वाद उफाळून आला. कामाची हमी मिळावी, न्याय मिळावा अशी मागणी उपस्थित कर्मचार्यांनी केली. तसेच या प्रश्नी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.