icc-aakash-chopra-questions-ms-dhoni-selection

(Sports News) आयसीसी (ICC) ने काहीच दिवसांपूर्वी दशकातल्या सर्वोत्तम वनडे, टी-20 आणि टेस्ट टीमची घोषणा केली. यातल्या टी-20 आणि वनडे टीमचं नेतृत्व एमएस धोनी (MS Dhoni) कडे सोपवण्यात आलं. तर विराट कोहली (Virat Kohli) याला टेस्ट टीमचं कर्णधार करण्यात आलं. आयसीसीच्या टी-20 टीममध्ये धोनीशिवाय कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनाही संधी देण्यात आली आहे. टीमच्या घोषणेनंतर अनेकांनी भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं, पण भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने टी-20 टीमच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

टी-20 टीममध्ये धोनीची निवड पाहून हैराण झालो, खासकरून जॉस बटलर सारख्या टी-20 स्पेशलिस्टची या टीममध्ये निवड न झालेली पाहून आश्चर्य वाटलं असं आकाश चोप्रा म्हणाला.'तुम्ही दशकातल्या टी-20 टीमची निवड करत असाल तर भारताने या दशकात काहीही जिंकलं नाही, तसंच धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली नाही. (Sports News) आपण एक टी-20 टीम बनवत आहोत आणि त्यात जॉस बटलरसारखे खेळाडू नाहीत,' अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली.

-----------------------------------------

Must Read

1) कोल्हापुरातील संवेदनशील 80 गावांत कडेकोट बंदोबस्त

2) शिवसेनेला रोखण्यासाठी नवी सत्ता समीकरणे?

3) महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडा

4) पुणेकरांना खूशखबर,PMPMLच्या ताफ्यात 150 इलेक्ट्रिक बसेस

5) पोलीसदादांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलले महत्त्वाचे पाऊल

-----------------------------------------

मागच्या 10 वर्षात धोनीने 73 टी-20 मॅचमध्ये 45.23 च्या सरासरीने 1,176 रन केले. यामध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर 56 रन होता.

आयसीसीची दशकातली टी-20 टीम

रोहित शर्मा, क्रिस गेल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा