how-to-read-recover-whatsapp-deleted-message

 WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. सध्या पर्सनल ते अगदी सोशल, अनेक ऑफिशियल चॅटही आता व्हॉट्सअ‍ॅपवर होत आहेत. अनेकदा लोकव्हॉट्सअ‍ॅप  WhatsApp वर मेसेज पाठवून नंतर डिलीट (Deleted messeges) करतात. समोरच्याकडून मेसेज डिलीट झाल्यानंतर त्याने नेमकं काय पाठवलं असेल, असे अनेक तर्क आपण लावत बसतो. पण आता यासाठी तर्क लावत बसण्याची गरज लागणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट झालेला मेसेज आता सहजपणे वाचता येणार आहे.

ज्यावेळी कोणी चॅटवर मेसेज पाठवून डिलीट करतं, त्यावेळी This message was deleted असं नोटिफिकेशन दिसतं. त्यानंतर एकदा डिलीट झालेला मेसेज वाचता येत नव्हता. पण आता एक अशी ट्रिक आहे, ज्याच्या मदतीने डिलीट केलेला मेसेजही वाचता येणार आहे.

डिलीट केलेला मेसेज वाचण्यासाठी -

- सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवर (Google Play Store) WhatsRemoved अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल.

- अ‍ॅप ओपन केल्यानंतर काही परमिशन्स मागितल्या जातील, त्या allow कराव्या लागतील.

- आता WhatsApp अ‍ॅक्सेस करण्याची परमिशन सिलेक्ट करावी लागेल.

- आता कोणीही व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज डिलीट केल्यास, तो वाचता येईल.

- हे अ‍ॅप केवळ अँड्रॉईड स्मार्टफोनसाठीच उपलब्ध आहे.

दरम्यान, युजर्सल margin: 18px 0px 0px; outline: none; padding: 0px;">

व्हॉटसअ‍ॅपचे जगभरात 1.5 अब्जांवर युजर्स आहेत. येत्या काळात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सुरू ठेवण्यासाठी या सर्व युजर्सला नवीन टर्म्स ऑफ सर्व्हिस स्वीकारावी लागेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागूकरण्यात येणार आहेत. जर युजर्सने या अटी स्वीकारल्या नाहीत, तर त्यांना त्यांचं अकाउंट डिलीट करावं लागणार आहे, अशी माहिती डब्ल्यूए बीटा इन्फोने (WA Beta Info) दिली आहे. मात्र या नव्या अटी नेमक्या काय असतील याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.