how to prevent eye damage from phonesHealth tips- दिवसभर काम करून तुमच्या डोळ्यांना आराम मिळत नाही, त्यानंतर जर तुम्ही रात्री झोपायच्या आधी स्मार्टफोनचा वापर केला तर ते डोळे ड्राय होतात आणि सूज येण्याच्याही तक्रारी सूरू होतात. जेव्हापासून इंटरनेट डेटा आणि स्मार्टफोन (smartphone) आले आहेत, तेव्हापासून त्यांचा बराच वापर सुरू झाला आहे. कामामुळे किंवा वेळ मिळाला तरी स्मार्टफोन्ससह लोक जास्त वेळ घालवू लागले आहेत. पण स्मार्टफोनचा जास्त वापर केल्याने तुमच्या आरोग्यावर आणि डोळ्यांवर वाईट परिणाम (how to prevent eye damage from phones) होतो.

बऱ्याचदा असे पाहिले जाते की, लोक त्यांच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले ब्राइटनेस फूल ठेवतात, झोपेच्या आधी स्मार्टफोनचा वापर करतात. स्मार्टफोनची चमक आणि फोनचा सतत वापर यामुळे आपल्या डोळ्यांचा वाईट परिणाम होतो. फोनमधून उत्सर्जित होणारा प्रकाश थेट डोळ्यातील पडद्यावर परिणाम करतो, ज्यामुळे डोळे लवकर खराब होऊ लागतात. इतकेच नाही तर हळूहळू पाहण्याची क्षमताही कमी होऊ लागते आणि डोकेदुखी वाढू लागते.

------------------------------------------------

Must Read

1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर

2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद

4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO


--------------------------------------------------------

डोळे कोरडे होतात

जास्त काळ स्मार्टफोनचा वापर केला तर ते डोळे कोरडे (affects to eyes) होण्यास सूरूवात होते आणि सूज येण्याची तक्रारही सुरू होते. यामुळे डोळ्यांना खाज सुटणे आणि जळजळ झाल्याच्या तक्रारी आहेत आणि डोळ्याच्या लफिक ग्रंथीवर त्याचा वाईट परिणाम होतो. (how to prevent eye damage from phones)

डोळ्यांचे संकुचित होऊ लागतात

स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे डोळ्यांतून पाणी (affects to eyes) येण्यास सुरुवात होते. मोबाइल उत्सर्जित करणारी किरणे डोळ्यांसाठी खूप हानीकारक असल्याचे सिद्ध होते. स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे डोळे ब्लिंक होण्याची प्रक्रिया कमी होते, ज्यामुळे डोळ्याची बुबुळ आणि रक्तवाहिन्याही संकुचित होऊ लागतात, ज्यामुळे डोकेदुखी वाढते.