gopichand padalkar


आमदार  गोपीचंद पडळकर आणि माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्ह्यातील कबनूर येथील शेतात औत हाकले. कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ किसान आत्मनिर्भर यात्रे दरम्यान कबनूर गावातील शेतकरी अनिल बापू माळी यांच्या शेतात (farming) ऊसाची फोडणी (भरणी) करत असताना पडळकर यांनी त्यांच्या शेतात चक्क औत हाकले (twitter post) आहे. 

आपण शेतकरी कुटूंबातील आहोत. शेतीकाम हे आपल्याला नवीन नाही याची प्रचीती त्यांनी करुण दिली. आमदार पडळकर व माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत हे कृषी विधेयकाच्या समर्थनात किसान आत्मनिर्भर यात्रेनिमित्त गुरुवारी चंदूर (ता हातकणंगले) येथे सभेसाठी रात्री उशिरा आले होते. सभा झाल्यानंतर ते कबनूर येथे शिवनंदी सांस्कृतिक भवनमध्ये विश्रांतीसाठी थांबले होते. 


सकाळी ते कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ किसान आत्मनिर्भर यात्रेसाठी निघाले असता भवनला लागूनच असलेल्या शेतात  (farming)  अनिल माळी हे औत हाकताना त्यांना दिसले. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांना औत हाकण्याचा मोह झाला. आमदार पडळकर आणि माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्याला सांगून सुमारे अर्धा तास औत हाकण्याचे काम  (twitter post) केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, सुधीर पाटील, अनिल डाळ्या, सुधीर पाटील, बी. डी. पाटील, हिंमत जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.