power loom


इचलकरंजी लॉकडाउनमध्ये थकलेल्या वीजबिलाबाबत काही अंशी यंत्रमाग उद्योजकांना (power loom) दिलासा मिळाला आहे. "महावितरण'च्या नवीन योजनेनुसार थकबाकी समान हप्त्यात भरता येईल. यासाठी इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनतर्फे "महावितरण'कडे पाठपुरावा केला होता. 

कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून उद्योगधंदे किमान 60 दिवस पूर्णपणे बंद होते. त्यानंतरही उद्योग सुरळीत होण्यास बराच कालावधी लागला. या काळात उद्योजकांचे सर्व प्रकारचे "पेमेंट' येण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे उद्योजकांना मार्चपासूनची वीजबिले भरण्यास अडचणी येत होत्या. यामुळे यंत्रमाग उद्योजकांना (power loom) समान हप्ते करून देण्याची मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने "महावितरण'कडे केली होती. त्यानंतर सातत्याने त्याचा पाठपुरावा केला होता. 

----------------------------------------
Must Read

1) नृसिंहवाडीतील दत्त जयंती सोहळा रद्द

2) ...आणि 'पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं?'

3) Two wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार

-----------------------------------------

"महावितरण'ने ही मागणी मान्य केली असून, उद्योजकांना समान हप्ते करून देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार "महावितरण'ने थकीत उद्योजकांसाठी एक नवीन योजना आणली आहे. यात थकीत असलेल्या उद्योजकांना समान हप्ते करून दिले जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी यंत्रमाग उद्योजकांनी "महावितरण'च्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. 

असोसिएशनशी संपर्क साधावा

या योजनेत समाविष्ट होऊन आपल्या वीजबिलांचे समान हप्ते करून घेऊन वीजबिल भरावे. तसेच, यासंदर्भात अडचण आल्यास असोसिएशनशी संपर्क साधावा. 

- सतीश कोष्टी, अध्यक्ष, 

इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन