gold silver price

सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण होताना दिसतेय. सलग तिसऱ्या दिवशी स्पॉट मार्केटसहीत फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्या-चांदीचे भाव नरम राहिले. यासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या (Gold)-चांदी (silver) ची घसरण दिसून येतेय. कोरोना लसीबद्दल (Corona Vaccine) येणाऱ्या बातमीमुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसतंय. 

---------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------

सोमवारपर्यंत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७ हजार ४८३ रुपये आहे. आधीच्या व्यापार सत्रापेक्षा हे १४२ रुपयांनी कमी होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव सरासरी १,७८१, ५० डॉलर होता. (Gold Silver Price)

सोन्याच्या दराप्रमाणे चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. चांदीचा आजचा भाव ५७ हजार ८०८ रुपये आहे. याआधी चांदीचा भाव ५८ हजार ५०९ रुपये प्रति किलोग्रॅम वर बंद झाले. आधीच्या व्यापारी सत्राच्या तुलनेत चांदी ७०१ रुपयांवर घसरली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची घसरण सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी २२.२९ डॉलर पर्यंत आहे.

सोन्या-चांदीच्या उतरत्या भावाचे कनेक्शन हे कोरोना वॅक्सीनच्या आगमनाशी जोडण्यात येतंय. कोरोना वॅक्सीन लवकर येईल अशी शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्यायत. (Gold Silver Price)त्यामुळे गुंतवणूकदार अधिक जोखीम घेत आहेत. येणाऱ्या काही दिवसात सोन्याच्या किंमती वाढतील असं दिसत नाहीय.