gold silver rate today-gold silver rate today-   ऐन सणासुदीच्या काळात कमी झालेले सोन्याचे दर पुन्हा वाढू लागल्याने सामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. लग्नसराई व लहान मुला, मुलींना सोन्याचे दागिने घ्यायचे आहेत, परंतू सोन्याचे वाढलेले दर उरात धडकी भरवत आहेत. कुठूनतरी सोन्याचे दर एवढ्याने कमी होणार किंवा झाले अशी माहिती समोर येते आणि हायसे वाटते. मात्र, गेल्या तीन दिवासांपासून सोन्यान पुन्हा उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. 

आज एमसीक्सवर बाजार उघडला तेव्हा फेब्रुवारीच्या सोन्याचा दर कालच्यापेक्षा 123 रुपयांनी जास्त होता. बुधवारी सोने 49597 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. आज सोने 49720 रुपयांवर उघडले. आता सोन्याचा दर 370 वाढून 49967 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर एप्रिल डिलिव्हरीचे सोने सकाळी 10 वाजता 223 रुपयांनी वाढून 49826 रुपयांवर ट्रेड करत होते. 

----------------------------------------------------------

Must Read

1) कोल्हापूर : पंचगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू

2) `पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....`

3) TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

4) ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

-------------------------------------------------------

चांदीच्या दरातही मोठी वाढ झालेली असून सध्या चांदी 67622.00 वर ट्रेड करत आहे. सध्या चांदीच्या दरात 1711 रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारात किंमती वाढल्याने बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारातही सोने 215 रुपयांनी वाढले होते. एचडीएफसी सिक्योरिटीजने ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,854 डॉलर प्रति औंस तर चांदी 24.72 डॉलर प्रति औंस वर होती. (gold silver rate today)

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घट झाली आहे. एकट्या नोव्हेंबरमध्येच सोने ४००० रुपयांनी घटले आहे. तर ऑगस्टपासून सोने ८००० रुपयांनी घसरले आहे. आता सोन्याच्या किंमतीबाबत (Gold Price in India) भारतीय बाजारात चांगले संकेत मिळत आहेत. २०२० संपायला एकच महिना राहिला आहे. 

म्हणजेच पुढील दोन महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सोन्याच्या किंमती घसरण्याची (Gold Price down) आशा व्यक्त केली जात आहे. २०२१ च्या सुरुवातीला सोने 42,000 प्रति ग्रॅम होण्याची शक्यता आहे. असे का होईल? याच्यामागे अनेक कारणे आहेत. मात्रस सर्वात मोठे कारण हे कोरोना आणि त्याला रोखण्यासाठी बनविण्यात येत असलेली लस हे आहे.