गेल्या सत्रात सोन्याची किंमतीत (Gold Silver Price) ०.२ टक्क्यांची घसरण होऊन ४९ हजार २०९ रुपये प्रति १० ग्रॅम किंमत होती. तसेच चांदीची किंमत ०.३ टक्क्यांनी वाढली होती. ऑगस्ट महिन्यात भारतात सोन्याची किंमत (gold rate) सर्वाधिक ५६ हजार २०० झाली होती. सध्याची सोन्याची किंमत ७ हजार रुपयांनी कमी झाली आहे. सोन्याचे व्यापारी या आठवड्याच्या शेवटी युरोपियन सेंट्रल बँक निधी संबंधातील निर्णयावर परिणामाची प्रतीक्षेत आहेत.
-------------------------------------------------------
आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) आज सोन्याची किंमत १,८३७ डॉलर प्रति औंस झाली आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटेन फायझर आणि बायोटेकची (Pfizer/BioNTech) कोरोना लस देणारा पहिला देश ठरला आहे. याशिवाय या आठवड्याच्या शेवटी अमेरिकेच अन्न व औषध प्रशासन कोरोना लसीसंदर्भात चर्चा करतील. त्यामुळे कोरोना लसीसंदर्भात सकारात्मक येणाऱ्या माहितीमुळे सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होत आहे.
मुंबईतील सोन्या-चांदीचे दर
आज मुंबईतील २२ कॅरटचा सोन्याचा दर ४८ हजार ३५० प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरट सोन्याच्या दर ४९ हजार ३५० प्रति १० ग्रॅम इतका आहे. तसेच चांदीचा दर मुंबईत ६३ हजार ९१० प्रति किलो आहे.