social media postentertainment
- रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा (genelia dsouza) बॉलिवूडच्या क्यूट कपलपैकी एक मानलं जातं. दोघांची बॉन्डींग त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर (social media post) आणि पब्लिक प्लेसमध्ये अनेकदा बघायला मिळते. त्यांचे फोटो-व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. १७ डिसेंबरला रितेशचा वाढदिवस होता. यानिमित्ताने जेनेलियाने त्याच्यासाठी एक फार सुंदर अशी नोट लिहिली आहे.

जेनेलियाने फोटोंचा एक स्लाइड शो तयार केला (social media post) आहे. तिने नोटमध्ये लिहिले की, लाइफमध्ये अनेकदा तुम्ही एका परफेक्ट व्यक्तीला शोधत असता, शोधत असता आणि बस शोधत असता. पण कधी कधी तुम्हाला ती व्यक्ती भेटत नाही. मी जेव्हा तुला भेटले तेव्हा मी तुला शोधले नव्हते. पण तुझ्यासारखा माणूस आयुष्यात असण्याची आयडिया मला आवडली. आणि मग तू माझ्या आयुष्यात आलास.जेनेलियाने (genelia dsouza) पुढे लिहिले की, आपण आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातून गेलोय. टीनेजर्स ते पती-पत्नी आणि पॅरेट्सपर्यंतचा हा प्रवास सुंदर होता. पण माझ्या आयुष्याच बेस्ट पार्ट तू आहेस. कितीही काळ लोटला तरी हे नाही बदलणार. त्यामुळेच हे मला मान्य की, आपल्याकडे सगळं काही परफेक्ट आहे. मला फक्त इतकं माहीत आहे की, आपण आपल्या इम्परफेक्शनसोबत, आपण विचित्र असण्यासोबत, आपल्या दोषांसह काही असं मिळवलंय जे इम्परफेक्टली परफेक्ट (entertainment) आहे. आय लव्ह यू रितेश. हॅप्पी बर्थडे नवरा'.