new virus variant in france

ब्रिटनमध्ये नवीन करोना विषाणूचा (virus variant) प्रकार समोर आला असून फ्रान्समध्ये पहिला रुग्ण सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. वेगाने संसर्ग होणारा करोनाचा हा नवा प्रकार अनेक देशांसाठी चिंतेची (new virus) बाब ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर ५० हून अधिक देशांनी ब्रिटनमधील वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. 

दरम्यान फ्रान्समधील हा पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये वास्तव्यास होता. लंडन येथून १९ डिसेंबरला तो परतला होता. या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणं दिसत नसून फ्रान्समधील आपल्या घऱात विलगीकरणात असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. २१ डिसेंबरला वैद्यकीय तपासणी केली असताना त्याला करोनाच्या नव्या विषाणूंची (virus variant) लागण झाली असल्याचं समोर आलं.

-----------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणाचे नियोजन

2) मी मात्र कोल्हापूरला परत जाणार' : चंद्रकांत पाटला

3) राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी

4) सरकारी नोकरीत अव्वल स्थानी असणारे भारताचे 7 स्टार क्रिकेटपटू

-----------------------------------

फ्रान्समध्ये करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला (new virus) सुरुवात केली आहे. यावेळी कोणामध्ये लक्षणं आढळली तर त्यांना विलगीकरणात ठेवलं जाणार आहे.