Flipkart’s Flipstart Days Sale


ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर आजपासून फ्लिपस्टार्ट डेज सेलला (Flipkart’s Flipstart Days Sale) सुरुवात झाली आहे. 1 ते 3 डिसेंबर या कालावधीत हा सेल सुरु राहणार असून सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे.

या सेलमध्ये विविध ब्रँडच्या हेडफोन्स (headphones) आणि स्पीकर्सवर (speaker) 70 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. याशिवाय बेस्ट सेलिंग लॅपटॉप्सवर 30 टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते. सेलमध्ये इअरफोन्स, विअरेबल्स आणि कॅमेऱ्यावरही डिस्काउंट मिळेल. फ्लिपस्टार्ट सेलमध्ये स्मार्ट वॉचेस आणि फिटनेस बँड 1299 रुपयांपासून खरेदी करता येतील. 

---------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------

सेलमध्ये (Flipkart’s Flipstart Days Sale) 8999 रुपयांपासून तुम्ही स्मार्ट टीव्ही विकत घेऊ शकता. शिवाय फक्त 129 रुपयांपासून मोबाईल अ‍ॅक्सेसरीज विकत घेता येतील. तसेच काही प्रसिद्ध ब्रँडच्या फ्रीज आणि टीव्हीवर 40 टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते. या सेलमध्ये ग्राहकांसाठी अन्य काही आकर्षक ऑफर्सही आहेत. यामध्ये नो कॉस्ट ईएमआय, एक्स्चेंज ऑफर आणि एक्सडेंडेट वॉरंटीचा लाभही मिळेल.

दरमहिन्याचे पहिले तीन दिवस Flipstart नावाने सेल आयोजित केला जाईल, सेलमध्ये जवळपास प्रत्येक कॅटेगरीमध्ये डिस्काउंट मिळेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.