flipkart Electronics Sale


नुकत्याच पार पडलेल्या शॉपिंग फेस्टिव्हल्सदरम्यान स्मार्टफोन्सवर (smartphone) मोठ्या प्रमाणात ऑफर्स देऊन मोबाईल्सची रेकॉर्डब्रेक विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने आता पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक सेल (Electronics Sale) सादर केला आहे. हा सेल उद्यापासून सुरु होत असून 28 डिसेंबरपर्यंत सुरु राहील. 

या सेलमध्ये तुम्हाला फ्लिपकार्टवरील प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूवर बंपर डिस्काऊंट दिला जाणार आहे. या डिस्काऊंट ऑफर्ससह आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट दिला जात आहे. तसेच कंपनीने जबरदस्त एक्सचेंज ऑफर्सही सादर केल्या आहेत.

---------------------------------------
Must Read

1) नृसिंहवाडीतील दत्त जयंती सोहळा रद्द

2) ...आणि 'पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं?'

3) Two wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार

4) 2021 च्या वर्षात सर्वाधिक वेळा 'वीकएंड'लाच येणार संकष्टी चतुर्थी

-----------------------------------------

फ्लिपकार्टने (Electronics Sale सर्वात मोठ्या ऑफर्स आयफोनच्या विविध मॉ़डेल्सवर ऑफर्स सादर केल्या आहेत. ग्राहक आयफोन एसई (Iphone SE) अवघ्या 32,999 रुपये इतक्या किंमतीत खरेदी करु शकतात. या फोनमध्ये तुम्हाला ए13 चा पॉवरफुल चिपसेट देण्यात आला आहे. सोबतच जबरदस्त कॅमेरा आणि शानदार डिझाईन देण्यात आलं आहे.

फ्लिपकार्टने आयफोन एक्स आर (Iphone XR) या मॉडेलवर 10 हजार रुपयांची सूट देऊ केली आहे. या फोनची मूळ किंमत 47 हजर 900 रुपये आहे. एक्सचेंज ऑफरवर हा फोन 34 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

आयफोन 11 प्रो (Iphone 11 Pro(smartphone) 79,999 रुपये इतक्या किंमतीत खरेदी करता येईल. या फोनची जुनी किंमत तब्बल 99,999 रुपये इतकी होती. या फोनवर तब्बल 20 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. ऑफर देण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या यादीतला पुढचा फोन आहे रियलमी X3 सुपरझुम (realme x3 superzoom). हा स्मार्टफोन 23,999 रुपयांमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत 27,999 रुपये आहे. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

नुकताच लाँच केलेला मोटो G 5G हा स्मार्टफोनही फ्लिपकार्टने डिस्काऊंट ऑफरसह विक्रीस उपलब्ध करुन दिला आहे. या फोनची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. तसेच HDFC आणि ICICI बँक कार्ड होल्डर्ससाठी या फोनवर डिस्काऊंट देण्यात आला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपही आहे.