alia and ranbir kapoorentertainment center-
बी-टाऊनमधलं क्युट कपल म्हणजे आलिया भट आणि रणबीर कपूर. गेल्या २ वर्षापासून हे दोघे एकमेकांना डेट (relationship) करत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळत असते.

आलियाला बर्‍याच वेळा तिच्या लग्नाच्या बातम्यांवरून आणि अफवांवर बोलताना पाहिलं आहे. रणबीरला  मात्र वैयक्तिक प्रश्नांवर बोलायला फारसं आवडत नाही. यापूर्वी, आलियाने बर्‍याच मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, ‘मी आत्ता फक्त २५ वर्षांची आहे त्यामुळे मला एवढ्या लवकर लग्न करायचे नाही.मला सगळेच जण विचारत असतात की आम्ही लग्न कधी करणार? पण मी आत्ता फक्त २५ वर्षांची आहे. एवढ्या लहान वयात लग्न करणे म्हणजे खूप घाई होईल. मला एवढ्यात लग्न करायचे नाही.रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान लग्नाविषयी (relationship) मोठा खुलासा केला आहे. रणबीरने सांगितले की, कोरोना सारखी महामारी आली नसती तर कदाचित तो लग्नाच्या बेडीत अडकला असता. यासह रणबीरनेही आलिया आणि त्याच्या  लग्नाचे संकेत दिले आहेत. एवढेच नव्हे तर आलियाची प्रशंसा करताना रणबीरने असेही म्हटले की, आलिया त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी  आहे. (entertainment center)