___________________________
Must Read
1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं
4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर
5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले
6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...
_____________________________
भारतीय किसान युनियनचे (बीकेयू-लाखोवाल) सरचिटणीस एचएस लखोवाल यांनी सिंधू सीमेवरील (दिल्ली-हरियाणा सीमा) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गुरुवारी आम्ही सरकारला सांगितले की, 'नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत. सरकारने आमचे म्हणणे न ऐकल्यास 8 डिसेंबर रोजी भारत बंद करण्यात येईल.' अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मुल्ला म्हणाले की, 'याला फक्त पंजाब चळवळ म्हणणे सरकारचे षडयंत्र आहे, पण आज हे आंदोलन संपूर्ण भारतभर सुरू आहे आणि पुढेही होईल. हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले. सरकारने उद्या कायद्यात दुरुस्तीबाबत चर्चा केल्यास ती स्वीकारणार नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे.'
दिल्लीला लागून असलेल्या हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांना हटवण्यासाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यानी शेतकऱ्यांना सीमेवरुन हटवण्याची मागणी केली आहे. गेल्या 8 दिवसांपासून केंद्रीय कृषी कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.