armers-protest-on-new-agriculture-law

 केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 8 दिवसांपासून पंजाब, हरियाणा इथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत झालेल्या 4 बैठका निष्फळ झाल्या असून अद्यापही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कृषी बिल रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर केवळ आश्वासन नको ठोस निर्णय घ्या असा शेतकऱ्यांचा सूर आहे.

Must Read

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून आज भारत बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी आज भारत बंद ठेवण्यात यावा असं नागरिकांना आवाहन केलं आहे. याशिवाय टोल नाका आणि महत्त्वाच्या रस्त्यावर गाड्या रोखून धरण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या चर्चेदरम्यान जर केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नवीन कृषी कायद्यांविरोधात त्यांचे आंदोलन तीव्र केले जाईल, असे शेतकरी नेते गुरनामसिंग चधू (Gurnamasing chudhu) नी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस हरिंदरसिंग लखवाल म्हणाले की, “आज झालेल्या बैठकीत आम्ही 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी आज पुन्हा एकदा पाचव्यांदा शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेदरम्यान तरी तोडगा निघणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेतकरी संघटनांनी केलेल्या मागण्यांवर केंद्र सरकार विचार करत आहे. शनिवारी होणाऱ्या बैठकीत यश नक्की मिळेल. 'मी शेतकऱ्यायांना हमी देतो की एमएसपीमध्ये कोणताही बदल होणार नाही. संघाची इच्छा असल्यास आम्ही ते लेखी देण्यास तयार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) बळकट करणे देखील आमचे प्राधान्य आहे असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत यशस्वी तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.