superwoman


entertainment news- सुपरहिरो म्हटलं की आयर्नमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅन अशा काही व्यक्तिरेखा आपल्या समोर येतात. परंतु गेल्या काही काळात मेन सुपरहिरोंसोबतच फिमेल सुपरहिरोंनी (superwoman) देखील तुफान लोकप्रियता मिळवली.

नुकताच वंडर वुमन १९८४ हा चित्रपट प्रदर्शित झाला. करोना पार्श्वभूमीवर देखील हा चित्रपटा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहांमध्ये गर्दी केली यावरुनच फिमेल सुपरहिरोंची क्रेझ आपल्या लक्षात येते. या फोटो गॅलरीमध्ये आपण गेल्या काही काळात तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या फिमेल सुपरहिरो पाहणार आहोत.

द ओल्ड गार्ड


द ओल्ड गार्ड - अभिनेत्री चार्लिस थेरॉन हिने या चित्रपटात सुपरहिरोची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अलिकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.  (entertainment news)

कॅप्टन मार्व्हल


कॅप्टन मार्व्हल - हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ब्री लार्सन हिने कॅप्टन मार्व्हल (actress) ही सुपरहिरो भूमिका साकारली (superwoman) आहे.

बर्ड्स ऑफ प्रे


बर्ड्स ऑफ प्रे - अभिनेत्री मार्गोट रॉबी हिने या चित्रपटात हार्ली क्विन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय पाहून प्रेक्षक अचंबित झाले होते.


लूसी - हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. स्कार्लेट जॉन्सन हिने या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

एक्स मॅन डार्क फिनिक्स


एक्स मॅन डार्क फिनिक्स - एक्स मेन फ्रेंचाईजीचा हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. सोफी टर्नर हिने या चित्रपटात फिमेल सुपरहिरोची भूमिका साकारली आहे.

ब्लॅक विडो


ब्लॅक विडो - मार्व्हलच्या आजवरच्या अनेक सुपरहिरोपटांमध्ये अभिनेत्री (actress) स्कार्लेट जॉन्सन हिने ब्लॅक विडो ही व्यक्तिरेखा साकारली आहे. अॅव्हेंजर्स एंडगेममध्ये या व्यक्तिरेखेचा शेवट करण्यात आला होता. मात्र प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ब्लॅक विडोचा स्डँड अलोन सुपरहिरोपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

वंडर वुमन १९८४

वंडर वुमन १९८४ - हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या वंडर वुमन या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा चित्रपटात अभिनेत्री गॅल गॅडोटने केलेले सुपरहिरो स्टँट पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.