web series - paurashpur


entertainment news- ऑल्ट बालाजी आणि जी५ वर प्रदर्शित होणाऱ्या ‘पौरषपूर’ या वेब सीरिजचा (web series) ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच ही वेब सीरिज त्यातील बोल्ड दृश्यांमुळे ()जोरदार चर्चेत आहे. यामध्ये मिलिंद सोमण, अन्नू कपूर, शिल्पा शिंदे, शाहीर शेख, पौलमी दास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीपासून बोल्ड दृश्यांचा भरणा पाहायला मिळतो.

------------------------------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------------------------

पुरुषांची मक्तेदारी, केवळ शारीरिक सुख देणारी वस्तू म्हणून स्त्रियांकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन, स्त्रियांना मिळणारी तुच्छ वागणूक हा या सीरिजच्या कथेचा गाभा आहे. पुरुषप्रधान राज्यात एक स्त्री सत्तेची खुर्ची मिळवण्यात यशस्वी होते का, हे या सीरिजमध्ये पाहायला मिळेल. या वेब सीरिजसाठी बराच खर्च करण्यात आला असून त्याचा सेट, कलाकारांचा पोशाख विशेष लक्ष वेधून घेतात.ही सीरिज (web series) येत्या २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याचे सात ते आठ भाग असतील. या सीरिजच्या माध्यमातून शिल्पा शिंदे ओटीटी विश्वात पदार्पण करतेय. तर छोट्या पडद्यावरील शाहीर शेख याचीही सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे.