NCP Leader Eknath Khadsepolitics news - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी आपल्याला अंमलबजावणी संचनालयानं (ED) नोटीस मिळाल्याचा खुलासा केला आहे. ED ची नोटीस मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहेत. त्यातून मोठी सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असं वाटत आहे की हा एक प्रकारचा माझावर अन्याय होत आहे. वारंवार चौकशी करणं, हे लोकांना फारसं पटलेलं नाही, अशी प्रतिक्रिया देखील एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP)गोटात सामील झाले आहे. एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना ED नोटीस बजावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ (politics news) उडाली आहे. मात्र, कालपासून एकनाथ खडसे यांनी याबाबत मौन स्वीकारलं होतं. शनिवारी सकाळपासून पत्रकारांनी एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. मात्र, काहीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला होता. मात्र अखेर एकनाथ खडसे यांनी मौन सोडून आपल्याला नोटिस मिळाल्याचा खुलासा केला आहे.

काय म्हटलं आहे नोटिशीत..?

एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबरला चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आला आहे. पुण्यातील भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ED नं एकनाथ खडसे यांना नोटीस बजावल्याचं बोलले जात आहे. मात्र, तरीही एकनाथ खडसे यावर बोलणं टाळत होते. दरम्यान, एकनाथ खडसे जळगाव येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतं. आता एकनाथ खडसे पत्रकारांशी काय संवाद साधतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.