crime news- टिकटॉकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन माधवनगर येथील एका महिलेने अल्पवयीन मुलाला घरी बोलवून त्याचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलाच्या (molestation) वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ४ जुलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली होती.

संजयनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नांदेड जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या १६ वर्षीय मुलाची टिकटॉकच्या माध्यमातून माधवनगर येथील एका महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीतून महिलेने जुलै २०१९ मध्ये मुलाला सांगलीतील माधवनगर येथील घरी बोलवले. (crime new)

__________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________

भेटायला नाही अलास तर माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेईन, अशी धमकीही तिने दिली. यानंतर वारंवार घरी बोलवून त्याला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग (molestation) पाडले. हा प्रकार संबंधित महिलेच्या पतीच्या लक्षात येताच तिने मुलाच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार केली. यानंतरही महिलेकडून मुलाला त्रास देण्याचे प्रकार सुरूच असल्याने अखेर पीडित मुलाच्या वडिलांनी सोमवारी (ता. ७) महिलेच्या विरोधात फिर्याद दाखल केली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.