ed-issues-notice-to-eknath-khadse

(ED) महाराष्ट्राच्या राजकारणातली आताची सर्वात मोठी बातमी आली आहे. भाजपामधून नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. तुम्ही माझ्यामागे ईडी लावाल तर मी सीडी लावेन, असं म्हणणाऱ्या एकनाथ खडसे (Eknath Khadseयांनी सीडी लावण्याआधीच त्यांच्यामागे ईडी लावण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांना बुधवारी ३० जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. 

पुण्यातील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. एकनाथ खडसे यांच्यासोबत पुण्यातील काही लोकांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. (ED) एकनाथ खडसे यांनी ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, अद्याप मला ईडीची नोटीस मिळालेली नाही. तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी आपल्याला या प्रकरणाशी काहीही घेणं देणं नाही किंवा आपण यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही.