dwarkanath sanzgir  yuzvendra chahal

हेल्मेटवर बसलेला चेंडू नेहमी दुःखच देतो असे नाही. तो सुखही देऊ शकतो आणि यशही. कॅनबेराच्या मनुका स्टेडियम (Raisin Stadium) वर ही गोष्ट हिंदुस्थानने 11 धावांनी जिंकल्यावर प्रत्ययास आली. कनकशनच्या नव्या नियमाने हिंदुस्थानला टी-20 च्या मालिकेतले पहिले यश मिळवून देण्याचा महामार्ग तयार करून दिला. डोक्यावर चेंडू बसल्याने कनकशन होऊ शकतं. त्यामुळेच अलीकडे एक नवीन नियम तयार केलेला आहे. 

___________________________

Must Read

1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

2) HDFC बँकेला मोठा झटका!

3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं

4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले

6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...

_____________________________

हेल्मेटवर चेंडू लागलेल्या खेळाडूला त्याच्यासारखा पर्यायी खेळाडू मिळू शकतो. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) टाकत असलेल्या अखेरच्या षटकात फटका मारताना जाडेजाच्या हेल्मेटवर चेंडू लागला. तो क्षेत्ररक्षणाला आला नाही. मॅच रेफ्रीच्या परवानगीने त्याची जागा गोलंदाजीसह चहलने घेतली आणि हिंदुस्थानी संघाचे नशीबच खदखदा हसायला लागलं. नशिबाला हसण्यासाठी गुदगुल्या नटराजन, वॉशिंग्टन सुंदर एकंदरीत आपल्या गोलंदाजांनी केल्या.

मॅचची अशी पटकथा कदाचित महर्षी व्यासच लिहू शकले असते. या कथेतला हिंदुस्थानी ड्रेसिंग रूममधला श्रीकृष्णा कोण आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. मॅचचा टर्निंग पॉइंट आधी पाहूया. तो होता जाडेजाची फलंदाजी. 6 बाद 114 वरून हिंदुस्थानी धावसंख्येला त्याने थेट 161 पर्यंत नेले. शेवटी चार षटकांत त्याच्यामुळे 57 धावा अक्षरशः बरसल्या. या धावा बरसत असताना त्याला दुखापत झाली. ती दुखापत हॅमस्ट्रिंगची किंवा तत्सम असावी. त्यावेळी त्याला सर्व वैद्यकीय मदत मिळाली, पण जेव्हा त्याचा फटका त्याच्या हेल्मेटला चाटून गेला त्यावेळेला ना कुणी डॉक्टर त्याची विचारपूस करायला आला न त्याने हेल्मेट बदलले (जे सर्वसाधारणपणे एका आघातानंतर हेल्मेट बदलले जाते). किंबहुना त्यानंतर तो अप्रतिम फटकेबाजी करीत गेला. 

त्यातला एक त्याचा पूल तर अंगावर शहारे उठवून गेला. त्यावेळी तो लंगडत असल्याने काळजी त्याच्या हॅमस्ट्रिंगची वाटली. त्याचबरोबर तो गोलंदाजी टाकू शकेल का ही चिंतासुद्धा सतवायला लागली. कारण तो टाकणार नसेल तर कोण टाकणार, हा प्रश्न उभा होताच. पण तो पॅव्हेलियनमध्ये गेल्यावर कुणाचा तरी मेंदू कृष्णासारखा चालला. त्याने कनकशनच्या कायद्यातून चोरवाट नाहीतर महामार्ग शोधला. कनकशन हे चेंडू लागल्याक्षणी होते असेच नाही. नंतरही जाणवू शकतं. त्यामुळे मॅच रेफ्री डेव्हिड बूनने पर्यायी खेळाडू द्यायची परवानगी दिली. विराट कोहली (Virat Kohli)ने ताबडतोब चहलला घेऊन त्याने आधी केलेली चूक सुधारली. 

कारण त्याने झाम्पाचं यश पाहिलं होतं. आणि तोही बाद झाला होता लेगस्पिनर मिचेल स्वेपसनच्या उसळलेल्या आणि झपकन आत आलेल्या चेंडूवर. थोडक्यात यशाच्या टप्प्यात आणण्याचं काम जाडेजानं आणि त्याच्या हेल्मेटनं केलं (हे हेल्मेट ऑस्ट्रेलियातल्या म्युझियमने जतन करून ठेवण्यासाठी मागवलंय अशी बातमी आहे). जाडेजाने मनुका मैदानावर दोन दिवसांत हे दुसरं वादळ उठवलं.

हा कनकशनचा कायदा फलंदाजांच्या भल्यासाठी आणि त्यामुळे संघाचं नुकसान होऊ नये म्हणून केलाय. पण त्यातून विजयाचा कसा महामार्ग खोदता येतो हे यावेळेस जाणवलं. फक्त सत्य बोलणाऱया धर्मालाही नरोवा कुंजरोवा म्हणून सत्यातून कशी वाट काढायची हे कृष्णाने शिकवलं होतं. हिंदुस्थानी संघातल्या कृष्णालाही वाट दिसली. त्यामुळे त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करायला हवं. अर्थात पुढची मॅच ही हिंदुस्थानी गोलंदाजांनीच जिंकून दिली. वॉशिंग्टन सुंदर पॉवर प्लेमध्ये उत्तम गोलंदाजी टाकू शकतो हे आयपीएलने दाखवूनच दिलं होतं. या अनुभवाचा फायदा विराट कोहलीने उचलला. नटराजनसाठी तर गेले काही महिने हे सुगीचे महिने आहेत. 

आयपीएलमधील यश मिरवत तो ऑस्ट्रेलियात आला आणि पहिल्याच आपल्या वन डेमध्ये त्याने अप्रतिम गोलंदाजी टाकली आणि हिंदुस्थानच्या विजयाला हातभार लावला. आणि आता पहिल्याच टी-20 त त्याने पुन्हा यश मिळवलं. ऑस्ट्रेलियाची आठवण म्हणून हे कॅनबेराचं मनुका मैदानं वळकटी करून आठवण म्हणून घरी घेऊन जायला त्याला नक्कीच आवडलं असतं. त्याला टी-20 ची कॅप बुमराहने दिली. बुमराहचा हात लागलेली टोपी घातल्यानंतर चेंडू वाह्यातपणा कसा करील. नटराजनचा टप्पा आणि दिशा याच्यावरची हुकूमत अतिशय चांगली होती. मला एका गोष्टीचा आनंद वाटला, चहल वन डेच्या अपयशातून दोन गोष्टी शिकला. 

त्याने झाम्पा कशी गोलंदाजी टाकतो हे पाहिलं होतं. त्याने त्याच्या पावलावर पाऊल ठेवलं. टी-20 हा असा फॉरमॅट आहे की एखादी चांगली खेळी, एखादा चांगला स्पेल किंवा दोन उत्तम झेल हरलेला सामना जिंकून देऊ शकतात. ती मॅच फिरवणारी खेळी होती जाडेजाची. ते स्पेल होते नटराजन, सुंदर व चहल यांचे. आणि दोन ग्रेट झेल होते संजू सॅमसन व हार्दिक पांडय़ा यांचे. त्यामुळे आधी सोडलेले दोन झेल (एक विराट कोहलीने) त्रासदायक ठरले नाही. ‘मॅन ऑफ दी मॅच’ अपेक्षेप्रमाणे चहलला दिलं. चहलने दोन फुलं जाडेजाच्या हेल्मेटलाही वाहवीत. हेल्मेटच्या रूपाने त्याला देव भेटला.