World AIDS Day 2020World AIDS Day 2020- जर एचआयव्ही (HIV) संसर्गाचे योग्य वेळी निदान झाले नाही आणि त्यावर योग्य उपचार केला गेला नाही तर त्या व्यक्तीला एड्स (AIDS) होण्याचा धोका जास्त असतो. एड्स हा एचआयव्हीचा शेवटचा टप्पा आहे आणि या अवस्थेत त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती इतकी कमकुवत होते, की त्याला कोणतंही संक्रमण सहजतेनं होतं.

--------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------

myupchar.com  चे डॉ. आयुष पांडे यांनी सांगतिलं, एचआयव्ही हे व्हायरल इन्फेक्शन आहे जे मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस किंवा एचआयव्हीमुळे होते. एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणं फ्लूसारखी असतात जी काही काळानंतर नाहीशी होतात. म्हणून बहुतेक लोकांना हे माहीतच नसतं की ते एचआयव्ही संक्रमित आहेत आणि शरीरात विषाणूंची वाढ होते. शेवटच्या टप्प्यात ग्रस्त व्यक्तीला अंधुक दृष्टी, वजन कमी होणं, कोरडा खोकला आणि धाप लागणं यासारख्या समस्या उद्भवतात.

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. अनुराग शाही म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील द्रव्य पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे जसं रक्त, शुक्राणू, आईचं दूध किंवा जननेंद्रियाचा इतर स्राव यातून हा संसर्ग पसरतो. कंडोमशिवाय लैंगिक संबंध हा प्रसार होण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे. एचआयव्हीचा संसर्ग World AIDS Day 2020 झाल्यास एखाद्या व्यक्तीस काही गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता असते.

शांत झोप आणि व्यायाम

एचआयव्हीग्रस्त लोक कमकुवत असतात आणि त्यांचं वजन देखील कमी होतं. अशा परस्थितीत त्यांना दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे जेणेकरून स्नायू आणि हाडं मजबूत राहतील. त्यांनी असा व्यायाम निवडला पाहिजे ज्यामुळे शारीरिक तणाव निर्माण होणार नाही. तसंच त्यांना दिवसातून कमीत कमी 8 तास झोप मिळणं आवश्यक आहे. जेणेकरून शरीर संक्रमणास अधिक सहजपणे लढायला सक्षम होईल.

मानसिक आणि भावनिक आरोग्य

एचआयव्ही बाधित व्यक्तीसाठी मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत अधिक चिंता आणि तणावयुक्त गोष्टींचा अधिक परिणाम होतो. एचआयव्हीच्या (HIV) निदानानंतर मानसिक धक्का जाणवू शकतो मात्र त्यातून बाहेर पडणं फार महत्त्वाचं आहे. मानसिकरित्या निरोगी राहण्यासाठी मित्र आणि कुटुंबाच्या कायम संपर्कात रहावं. कारण एकाकीपणामुळे नैराश्यात जाण्याचा धोका असू शकतो.

आहाराची काळजी

आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करणारे पदार्थ खा. दिवसातून दोन किंवा तीन वेळा खाण्याऐवजी एकदाच थोडंसं खा.

स्वच्छतेची काळजी घ्या

जर एचआयव्हीग्रस्त रुग्णाची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली तर संक्रमणाचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत स्वच्छता ठेवा. वारंवार हात धुवा आणि आजारी लोकांपासून अंतर ठेवा.

नियमित तपासणी आवश्यक

एचआयव्हीचं निदान झाल्यानंतर नियमित तपासणीसाठी डॉक्टरकडे जा. आवश्यक नसलेली कोणतीही औषधं घेऊ नका त्यानं दुष्परिणाम होऊ शकतात. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं नियमितपणे घ्या.

व्यसनापासून दूर रहा

एचआयव्हीग्रस्त व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्यसन त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मद्यपान किंवा ड्रग्स घेतल्यानं उपचारांचा उपयोग होणार नाही. चक्कर येणं आणि अशक्तपणा येऊ शकतो. जर सिगारेट पिण्याची सवय असेल तर ती सोडावी अन्यथा हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका उद्भवू शकतो.

सुरक्षित लैंगिक संबंध

एचआयव्हीने ग्रस्त व्यक्ती लैंगिक संबंध ठेवू शकत नाहीत ही धारणा चुकीची आहे.पण संभोग करताना कंडोम वापरणं महत्त्वाचं आहे. यामुळे जोडीदाराला संसर्ग होणार नाही. तसंच जर तुम्हाला एचआयव्हीचं निदान झालं असेल तर लैंगिक संसर्गाची स्वत:ची तपासणी करून घ्या. कारण या समस्या एचआयव्ही वाढवू शकतात.