Kolhapur Election Update


Kolhapur Election Update- पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मतदानास  उत्साहात सुरवात झाली . सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास (election) सुरवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत आहे.  

जिल्ह्यातील 281 केंद्रावर मतदान सुरू आहे. साडे तीन हजार कर्मचारी मतदान केंद्रावर काम करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीतजास्त मतदान (election) व्हावे यासाठी सर्वच उमेदवार समर्थक प्रयत्न करत आहेत. 

आज  दुपारी बारा पर्यत शिक्षक मतदारसंघात 43.12  टक्के .तर पदवीधर मतदारसंघात 28.36 टक्के मतदान झाले. तर दुपारीकोल्हापुरात शिक्षक मतदार संघासाठी चुरशीने मतदान : दुपारी 2 पर्यंत 67.17 टक्के मतदान. पदवीधर साठी 45.33 टक्के मतदान झाले.

Kolhapur Election Update- विधान परिषद निवडणूक 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ 

विधान परिषद निवडणूक२०२० 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ

जिल्हा : कोल्हापूर 

पदवीधर मतदार संघ मतदान
(एकूण मतदान केंद्रे: २०५)
पुरुष पदवीधर मतदार: ६२७०९
स्त्री पदवीधर मतदार: २६८२०
एकूण पदवीधर मतदार: ८९५२९
सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत  झालेले मतदान
पुरुष:३०७९६
स्त्री :९७८४
एकूण :४०५८०
 मतदान टक्केवारी :४५.३३ %

शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: ७६)
पुरुष शिक्षक मतदार: ८८७९
स्त्री शिक्षक मतदार :३३५८
एकूण शिक्षक मतदार: १२२३७
सकाळी ८ ते दुपारी २ कालावधीत झालेले मतदान
पुरुष: ६२८१
स्त्री : १९३४
एकूण : ८२७५
 मतदान टक्केवारी:  ६७.१७%