disha pataniphotoshoot- बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर दिशाच्या फोटोंना खूप पसंती मिळत असते. आता तिने लेटेस्ट फोटो शेअर (viral on social media) केला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. दिशाचे चाहते तिची प्रशंसा करून थकत नाही आहेत. टायगर श्रॉफला देखील दिशाचा लूक खूप भावला आहे.

फोटोमध्ये दिशा पिंक ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे. तिने सुंदर नेकलेस परिधान केला आहे आणि यासोबत तिने लुई विंतोची बॅग घेतली आहे. टायगर श्रॉफने दिशाच्या या फोटोला लाइक केले आहेत. तिचे चाहते ब्युटीफूल, गॉर्जस आणि हॉट अशी कमेंट्स करत आहेत. या फोटोला आतापर्यंत १८ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र दोघे आपल्या नात्याबद्दल खुलून बोलत नाही.मागील महिन्यात नोव्हेंबरमध्ये दोघे मालदीव व्हॅकेशनला गेले होते. यावेळी दोघांनी स्वतःचे फोटो सोशल मीडियावर  (viral on social media) शेअर केले होते.

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दिशा पटानी शेवटची मलंग चित्रपटात दिसली होती. आता ती 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मध्ये दिसणार आहे.यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी भेटीला येणार आहे.तर टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याच्याकडे बरेच प्रोजेक्ट्स आहेत ज्यात बागी ४, हिरोपंती २, रैम्बो आणि गणपत यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.