Dawood Ibrahim


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या पुतण्याचा कोरोनामुळे  (effect of corona) मृत्यू झाला आहे. सिराज साबिर कासकर (वय-38) असं त्याचं नाव आहे. दाऊदचा थोरला भाऊ साबिर कासकर याचा तो मुलगा होता.

सिराज साबिर कासकर याला श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं त्याला तातडीनं कराची येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्याची प्रकृती अधिकच ढासळली आणि त्याचा बुधवारी मृत्यू झाला.

---------------------------------------
Must Read

1) नृसिंहवाडीतील दत्त जयंती सोहळा रद्द

2) ...आणि 'पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं?'

3) Two wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार

4) 2021 च्या वर्षात सर्वाधिक वेळा 'वीकएंड'लाच येणार संकष्टी चतुर्थी

-----------------------------------------

दाऊदचा (Dawood Ibrahim)  थोरला भाऊ साबिर कासकर याचा मुलगा सिराज साबिर कासकर(वय-38) हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. श्वसनाचा त्रास (effect of corona) सुरू झाल्यानं त्याला तातडीनं कराची येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. भारतीय सुरक्षा एजन्सीला कराचीहून येणाऱ्या कॉल्सच्या माध्यमातून ही माहिती समजलं.

दरम्यान, पाकिस्तानात (Pakistan) कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच विविध अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पाकिस्तानात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचं समजतं.