Terrible explosion of a domestic gas cylinder

 Gas cylinder  blast :  लालबागमध्ये रविवारी सकाळी लग्नघरात घरगुती गॅस सिलिंडर (Gas cylinder) चा भीषण स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत 16 जण होरपळले. यातील एका वृद्ध महिलेचा रात्री मृत्यू झाला तर 9 जण गंभीर असून सहा जणांची प्रकृती स्थिर आहे. जखमींवर परळच्या केईएम आणि भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हळदीला येणाऱयांसाठी जेवण बनवत असताना गॅस गळती (Gas leak) होऊन ही दुर्घटना झाली.

Must Read 

लालबागमध्ये रविवारी सकाळी साडेसातला गणेश गल्लीजवळची साराभाई ही तीन मजली इमारत घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटाने हादरली. दुसऱ्या मजल्यावरील केटरिंग व्यावसायिक मंगेश राणे यांची मुलगी पूजा हिचे लग्न 9 डिसेंबरला असल्याने त्यांच्या घरात रविवारी हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी येणाऱ्या मोजक्या निमंत्रकांसाठी सकाळपासूनच मंगेश राणे (61), त्यांचा मुलगा यश (19) आणि त्यांचा एक कारागीर करीम (45) जेवण बनवत होते. यावेळी गॅसची गळती सुरू झाली.  (Gas cylinder  blast) त्यानंतर झालेल्या स्फोटात मंगेश राणे, यश आणि कारागीर करीम यांच्यासह 16 जण होरपळले.

राणे यांचे दुसरे घर लालबाग मार्केटमध्ये आहे. तिथे मुलगी आणि इतर व्यक्ती राहत असल्यामुळे ते स्फोटातून बचावले. मात्र स्फोटात जखमी झालेल्या सुशीला बंगेरा (62) यांचा रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला. स्फोटानंतर इमारत सील केल्यामुळे शिवसेनेने इमारतीमधील रहिवाशांच्या तात्पुरती राहण्याची व्यवस्था शेजारच्या हिरामणी हॉटेलमध्ये केली होती. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी साराभाई इमारतीची पाहणी केली तसेच केईएममध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी आमदार अजय चौधरी, नगरसेवक अनिल कोकीळ, सुधीर साळवी, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, डॉ. बांगर आदी उपस्थित होते.

राणे यांच्यापासून एक खोली सोडून राहणारे (Gas cylinder  blast)महेश मुंगे हेदेखील त्याच वेळेस गॅसचा वास कुठून येतोय म्हणून बाहेर बघायला आले आणि तेवढय़ात स्फोट झाला. स्फोटामुळे उठलेल्या आगीत मुंगेदेखील गंभीर होरपळले.

केईएममधील जखमी  

प्रथमेश मुंगे (27)
ज्ञानेश्वर सांवत (85)
विनायक शिंदे (75)
ओम शिंदे (20)
मिहीर चव्हाण (20)
मंगेश राणे (61)
यश राणे (19)
करिम  (45)
रोशन अंधारे (35)
महेश मुंगे (56)
ममता मुंगे (48)

मसिनामधील जखमी
वैशाली हिमांशू (44)
त्रिशा (13)
बिपीन अंबिके (50)
सूर्यकांत अंबिके (60)

दिल्लीवरून आईला पाहायला आली आणि… 

दुसऱया मजल्याच्या कोपऱयावर दोन रूममध्ये अंबिके कुटुंबीय राहतात. सूर्यकांत अंबिके यांची दिल्लीला राहणारी वैशाली हिमांशू (44) ही मुलगी तिच्या त्रिशा (13) या मुलीसह 15 दिवसांपूर्वी मुंबई रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईला भेटण्यासाठी आली होती. ती सकाळी या स्फोटात सापडली. जखमी झालेल्या वैशाली, तिचे वडील सूर्यकांत, नात त्रिशा आणि मुलगा बिपीन (Gas cylinder  blast)अशा अंबिके पुटुंबीयांमधील चौघांवर भायखळाच्या मसिना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ज्यांनी दरवाजे उघडले ते स्फोटात सापडले 

सकाळी गॅस गळती सुरू झाली, मात्र याची कल्पना शेजाऱ्यांना नव्हती. रविवार असल्यामुळे काही झोपेत होते तर काही जणांना गॅसचा वास आल्यामुळे ते जागे झाले. मात्र तोपर्यंत गॅस गळती मजल्यावर पसरली होती आणि काही समजण्याच्या आतच संपूर्ण इमारत स्फोटाने हादरली. मजल्यावर ज्यांच्या घराचे दरवाजे बंद होते ते या स्फोटाच्या कचाटय़ात सापडले नाहीत. मात्र ज्यांचे दरवाजे उघडे होते आणि जे त्या क्षणी बाहेर आले ते या स्फोटात सापडले, अशी माहिती राणे यांच्या समोरच्या घरात राहणारे प्रशांत सारंग यांनी दिली.

गळतीची कल्पना दिली. पण… 

तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी महेश नेरूरकर हे नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता लालबाग मार्केटमध्ये दूध आणि इतर सामान घेण्यासाठी खाली उतरले. खाली दुसऱ्या मजल्यावर आल्यावर त्यांना गॅसचा वास आला त्यामुळे नेरूरकर यांनी मंगेश राणे यांच्या घरी येऊन गॅसचा वास येत असल्याचे सांगितले, मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नेरूरकर मार्केटमधून जाऊन पुन्हा घरी येत असताना त्यांना राणे यांच्या घरातून गॅसचा आणखी वास येत असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी पुन्हा राणे यांना याची कल्पना दिली, मात्र त्याकडेही राणे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे नेरूरकर आपल्या घरी यायला निघाले. नेरूरकर तिसरा मजल्याचा जिना चढून जात असतानाच स्फोटाची दुर्दैवी घटना घडली. यात नेरूरकर किरकोळ जखमी झाले.

तेव्हाच समजले असते तर ही दुर्घटना टळली असती… 

राणे यांच्या समोरच्या खोलीत राहणारे प्रशांत सारंग हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजता पाणी सोडण्यासाठी उठले होते. त्यांनी राणेंच्या (Gas cylinder  blast)अगदी समोर राहणाऱ्या रंजना चव्हाण यांनादेखील उठवले, पण तेव्हा त्यांना गॅसचा वास आला नाही. त्यानंतर पाच मिनिटांनी स्वतः राणे हे प्रशांत यांना जाऊन भेटले आणि पाणी सोडण्याबाबत म्हणाले, परंतु तेव्हादेखील गॅसचा वास आला नाही. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी राणेंच्या घरातच स्फोट झाला. अक्षरशः हादरलो, बाहेर आलो तर समोरचे चित्र विदारक होते.

राणे यांचा कारागीर उडून रंजना चव्हाण यांच्या घरात येऊन पडला होता. तो गंभीर होरपळला होता, तर राणेदेखील गंभीर जखमी झाले होते. घराच्या भिंती कोसळल्या होत्या. कोपऱयातल्या खोलीत राहणाऱया सुशीला बंगेरा या वृद्ध महिलादेखील भाजल्या होत्या, तर इमारतीच्या जिन्यावर मुंगे जखमी अवस्थेत पडले होते. सारंग यांच्या घरातदेखील स्फोटामुळे आग लागली होती. आजूबाजूच्या घरात तेच चित्र होते. त्यावेळी एकटा पडल्याने मदत काय करू आणि काय नको अशा मनःस्थितीत होतो असे प्रत्यक्षदर्शी प्रशांत सारंग यांनी सांगितले.