raju shettipolitics news of maharashtra- स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. सांगलीमध्ये किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

सत्तरच्या दशकात आलेल्या पिंजरा या चित्रपटातील आदर्श शिक्षकाला एका मोहापायी तमाशाच्या फडात तुणतुण घेऊन उभं रहाव लागतं. तशी अवस्था राजू शेट्टींची झाली असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे.


विधान परिषदेच्या आमिषापोटी शेतकऱ्यांचा नेतृत्व करणारे राजू शेट्टी आडतदार, दलालांसाठी महाविकास आघाडीच्या बाजुने तुणतुणे घेऊन उभे राहून त्यांची वकिली ते करत असल्याचं शेलार म्हणाले. त्यामुळे शेलारांनी केलेल्या या टीकेवर राजू शेट्टी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (politics news of maharashtra)


----------------------------------------------------

Must Read

1) मोठी बातमी : एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली

2) मराठा समाजाला राज्य सरकारचा दिलासा

3) SC, ST विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज!

4) हेअरकटनंतर व्हायरल झाला फोटो, तब्बल 10 वर्षांनंतर झाली कुटुंबीयांची भेट

5) सुरेश रैनाने मागितली माफी, 'त्या' रात्रीची पूर्ण कहाणी समोर

6) मलम लावण्याच्या बहाण्याने तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श

--------------------------------------------------------


दरम्यान, कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या 'किसान आत्मनिर्भर यात्रे'च्या पार्श्वभूमीवर 'कोणीही आमच्या बालेकिल्ल्यात आले तरी काही फरक पडणार नाही, असा टोला शेट्टी यांनी लगावला होता.