criticize to eknath khadasepolitics news of maharashtra- राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते असलेले जामनेरमधील प्रफुल्ल लोढा यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह गिरीश महाजन, रामेश्वर नाईक आणि पारस ललवाणी यांच्यावर गंभीर आरोप (criticize to eknath khadase) केले आहेत.

गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्या गैरकृत्याची फाईल माझ्याकडे असल्याचं मी एकनाथ खडसे यांना सांगितलं होतं. यानंतर ही फाईल आपल्याला मिळावी, यासाठी खडसे यांनी आपल्याकडे मागणी केली होती. मात्र त्या फाईलमध्ये काही निरपराध लोकांचं सार्वजनिक आयुष्य खराब होणार असल्याने आपण ती त्यांना दिली नाही, असं लोढा यांनी सांगितलं आहे.

-----------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणाचे नियोजन

2) मी मात्र कोल्हापूरला परत जाणार' : चंद्रकांत पाटला

3) राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी

4) सरकारी नोकरीत अव्वल स्थानी असणारे भारताचे 7 स्टार क्रिकेटपटू

-----------------------------------


खडसे हे अतिशय खालच्या पातळीचं राजकारण करत असून त्यांनी आपल्या विश्वासाला त्यांनी धोका दिला आहे, असा आरोपही लोढा यांनी केला आहे. (politics news of maharashtra)

ही फाईल महत्वाची असल्याने खडसेंनी गृहमंत्र्यांची दिशाभूल करत पुणे पोलिसांच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने बीएचआर घोटाळ्याशी आपला संबंध असल्याचं भासवून ती फाईल मिळविण्यासाठी आपल्या घराची तसेच आपल्या जवळच्या मित्रांच्या घराची आणि नातेवाईकांची तपासणी केली, असं लोढा यांनी म्हटलं आहे.