red light area raid


देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) शहरात सर्वात मोठ्या असलेल्या गंगाजमुना देहव्यापार वस्तीवर (red light area raid) पोलिसांच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. लकडगंज पोलिसांनी गंगाजमुना वेश्यावस्तीवर छापा टाकून 125 पेक्षा अधिक महिला व पुरुषांना पकडण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, यात 10 ते 12 अल्पवयीन मुली असल्याचा संशय आहे.

गंगाजमुना वस्ती कायम देहव्यापार आणि गुन्हेगारांसाठी (crime news) ओळख निर्माण झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री गंगाजमुना वेश्या वस्तीवर धडक कारवाई केली. गंगाजमुना वस्तीत अल्पवयीन मुलींनी आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, देहव्यापारामध्ये अडकवलेल्या अल्पवयीन मुलींच्या सुटकेसाठी गुन्हे शाखा आणि रेस्क्यू लकडगंज पोलिसांनी ऑपरेशन (red light area raid) राबवले होते.

---------------------------------------------------------------

Must Read

1) शरद पवारांकडून पुन्हा चकवा?

2) Alert! जगभरात अनेक ठिकाणी FB मेसेंजर आणि Instagram डाउन

3) GOOD NEWS! आजोबा मुकेश अंबानीचा नातवासोबतचा पहिला खास फोटो

4) मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर

5) गर्लफ्रेंडशी लग्न झालं नाही म्हणून संतापलेल्या बॉयफ्रेंडनं केलं ‘हे’ भयंकर कृत्य

--------------------------------------------------------------------------

देहव्यापाऱ्याच्या (brothel) बहुतांश अड्डयांमध्ये गुप्त तळघर तयार कण्यात आले आहेत. पोलीस कारवाई होताच दरवाजे बंद करून तरुणींना या तळघरात लपवण्यात येते. सायंकाळपर्यंत बहुतांश दरवाजे तोडून आरोपींना अटक केली व महिलांना मुक्त करण्यात करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत 125 पेक्षा अधिक महिला व पुरुषांना पकडण्यात आले. या महिलांमध्ये 10 ते 12 अल्पवयीन मुली असण्याचा संशय आहे.

रात्री उशिरापर्यंत अल्पवयीन मुलींचा शोध घेत लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात सुद्धा लकडगंज पोलिसांनी गंगाजमुना वेश्यावस्तीवर धडक कारवाई केली होती. यावेळी पोलिसांनी 16 महिला आणि 12 ग्राहकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आजही दुसरी कारवाई आहे.

नागपूर शहरातील गंगा-जमुना परिसरात देहव्यापार मोठ्या प्रमाणात केल्या जातो. या ठिकाणी महिला रस्त्यावर उभ्या राहून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव करतात. यामुळे परिसरातील लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. या परिसरातून ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य महिलांकडेही संशयाच्या नजरेने बघितले जाते. सर्वाधिक वारांगणा काश्मिरी गल्लीत आहेत. कोरोनाच्या काळात हा परिसर बंद होता पण आता पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे या भागात आता गुन्हेगारी घटनांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.