Pregnancy testcrime news-
कोडोली येथील मातृसेवा हॉस्पिटलमध्ये (Maternity Hospital) बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी (Pregnancy test) सोनोग्राफीच्या माध्यमातून करून अर्भक स्त्री की पुरुष असल्याचे सांगण्यासाठी २० हजार रूपयाची मागणी करताना डॉ. अरविंद कांबळे याला रंगेहाथ पकडले. डॉ. कांबळे याच्यावर कोडोली पोलिसांत गुन्हा  दाखल करण्यात आला. 

डॉ. अरविंद कांबळे हे मातृसेवा हॉस्पीटल (Maternity Hospital) येथे हजारो रुपये घेवून गर्भलिंग निदान करतात अशी गुप्त माहिती पोलिसांसह आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाली होती. सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा वेदक यांनी आरोग्य विभाग व पोलिसांचे पथक तयार करून सहानिशा करण्यासाठी डमी ग्राहक पाठवला. या ग्राहकाची डॉ. कांबळे याने तपासणी केली व स्त्री अर्भक असल्याचे सांगून गर्भपात करण्यासाठी २८ हजारांची मागणी केली. 

----------------------------------------------------------

Must Read

1) कोल्हापूर : पंचगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू

2) `पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....`

3) TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

4) ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

-------------------------------------------------------

तडजोडीअंती २० हजार रूपयावर गर्भपात करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे वीस हजार रूयांची रक्कम डॉ. कांबळे याने घेऊन डमी महिलेची सोनोग्राफी केली आणि मुलगी असल्याचे सांगीतले. तसेच अद्याप लिंगाची स्पष्टता दिसून येत नसल्याने  २८ डिसेंबर रोजी या आणि त्यावेळी गर्भपात करू असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार  डॉ. वेदक यांनी सापळा रचून डॉ. अरविंद कांबळे याला रंगेहाथ पकडले.  डॉ. कांबळे याने गर्भलिंग निदान (Pregnancy test) केल्याचे कबूल केले. (crime news)

डॉ. कांबळे याच्या हॉस्पीटलचे सोनोग्राफी मशीन २०१७ पासून सील आहे. याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अंधश्रद्धां निर्मूलन समितीच्या गीता हसूरकर, अॅड. गौरी पाटील, वैद्यकीय अधिक्षक पन्हाळा तथा समूचीत अधिकारी डॉ. सुनंदा गायकवाड, पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी, फौजदार विभावरी रेळेकर, पोलिस नाईक अभिजीत घाटगे, कोडोली पोलिस ठाण्याचे फौजदार नरेद्र पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.